Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu
जि.प.केंद्रीय उच्च प्राथमिक मराठी कन्या शाळा विडूळ तर्फे आपले ब्लॉगवर हार्दिक स्वागत! ब्लॉगचे काम चालू आहे भेटीबद्दल धन्यवाद !

Friday 30 September 2016

📕 *प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत प्रगत शाळा घोषित करण्यासाठी आवश्यक २५ निकष* 📕

*खालील निकषांपैकी प्रत्येक निकष पूर्ण असेल तरच १०० % गुण मिळतील आणि तीच शाळा प्रगत समजली जाईल.*
  *प्रगत शाळा निकष आणि गुण*
👇👇👇👇👇👇👇👇👇👇

१) *पट आणि वर्षभराची सरासरी उपस्थिती (५ गुण)*

२) *शाळाबाह्य बालके आणि प्रत्यक्ष प्रवेशीत बालके (५ गुण)*

३) *शाळा परिसर अगदी स्वच्छ असल्यास (५ गुण)*

४) *प्रत्येक विषयासाठी ज्ञानरचनावादी साहित्य किमान*
*१० घटकावर आधारित २० प्रकारचे साहित्य शिक्षकांनी स्वनिर्मित असल्यास (५ गुण)*

५) *कोणतयाही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास किमान ५ गणिती संख्या वाचता लिहता येणे.ई.१ली साठी २ अंकी आणि त्यापुढील इयत्तासाठी १ अंक वाढवत जाणे. (५ गुण)*

६) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही किंवा सर्व विद्यार्थ्यास शैक्षणिक साहित्याच्या साहाय्याने किमान एक बेरीज करता येणे. (५ गुण)*

७) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही किंवा सर्व विद्यार्थ्यास शैक्षणिक साहित्याच्या साहाय्याने किमान एक वजाबाकी करता येणे. (५ गुण)*

८) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही किंवा सर्व विद्यार्थ्यास शैक्षणिक साहित्याच्या साहाय्याने किमान एक गुणाकार करता येणे. (५ गुण)*

९) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही किंवा सर्व विद्यार्थ्यास शैक्षणिक साहित्याच्या साहाय्याने किमान एक भागाकार करता येणे. (५ गुण)*

१०) *वजन/मापे/आकारमान/लांबी/वेळ यावर  उदाहरणे सोडवता येणे (५ गुण)*

११) *प्रत्येक वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यास त्या इयत्तनुरूप किमान ५ वाक्ये वाचता येणे .(५ गुण)*

१२) *प्रत्येक वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यास त्या इयत्तनुरूप किमान ५ वाक्ये श्रुतलेखनाने लिहता येणे .(५ गुण)*

१३) *वर्गानुकूल आशयाच्या अकलनावर कोणत्याही विद्यार्थ्यास ५ प्रश्नांची उत्तरे देता येणे.(५ गुण)*

१४) *प्रत्येक वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यास एक शब्द दिल्यानंतर त्या शब्दाच्या शेवटच्या अक्षरापासून पाठपुस्तकाबाहेरील किमान ५ शब्द तयार करता येणे. (५ गुण)*

१५) *कोणत्याही विद्यार्थ्यास पथ्यपुस्तकातील कोणतीही कविता साभिनय सादर करता येणे.(५ गुण)*

१६) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास चित्रवाचन करता येणे.(५ गुण)*

१७) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास वर्गानुकूल ३ शब्द दिल्यास किमान ५ वाक्ये तयार करता येणे.(५ गुण)*

१८) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास वर्गानुकूल ३ सोपे शब्द दिल्यास त्यापासून गोष्ट तयार करता येणे.(५ गुण)*

१९) *मुलांच्या चेहऱ्यावर , बोलण्यात, उत्तरे देण्यात कमालीचा आत्मविश्वास दिसून येतो.(५ गुण)*

२०) *प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यास किंवा सर्व विद्यार्थास एक छोटी नाटिका सादर करता येणे.(५ गुण)*

२१) *प्रत्येक वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यास घड्याळाची काटे फिरवून अचूक वेळ सांगता येणे.(५ बोनस गुण)*

२२) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास वर्गानुकूल ३ सोपे शब्द दिल्यास त्यापासून कहोती कविता तयार करता येणे.(५ बोनस गुण)*

२३) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास वर्गानुकूल ५ इंग्रजी प्रश्नांची उत्तरे देता येणे. (५ बोनस गुण)*

२४) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास वर्गानुकूल एका वस्तूचे चित्र रेखाटता येणे. (५ बोनस गुण)*

२५) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास वर्गानुकूल दआलेल्या विषयावर स्वतःचे मत मांडता येणे. (५ बोनस गुण)*
                       *सर्व २५ निकषांच्या आधारावर किमान ८० गुण मिळाल्यास आणि संकलित २ च्या चाचणीत प्रत्येक विद्यार्थ्यास किमान ४० % गुण मिळाल्यास ती शाळा प्रगत घोषित करण्यात येईल.*

Saturday 17 September 2016

💻 💿📡चला तंत्रस्नेही बनुया💿📡 💻
*मोबाईल मधील WPS Office मधून Pdf File कशी बनवावी?*
         🔵🔶🔵🔶🔵🔶🔵
        🙏 *आपलाच तंत्रस्नेही मित्र* 🙏
              *शिवाजी नवाळे सर*
                  *राहुरी अ'नगर*
      *प्रगत तंत्रस्नेही महाराष्ट्र समूह प्रमुख*
 7⃣7⃣5⃣8⃣0⃣7⃣4⃣2⃣7⃣5⃣  
     🔵🔶🔵🔶🔵🔶🔵🔶🔵
         *मित्रांनो Wps office मधून pdf file बनविण्यासाठी दोन पर्याय आहेत.*
▶  *1) रेडीमेड copy मेसेज ची pdf file बनवणे व*
▶ *2) WPS Office मध्ये मेसेज टाईप करून pdf file बनविणे.*
          *आज आपण wps office मध्ये pdf file कशी तयार करायची याची माहिती घेऊया.*
                *पद्धत 1ली*
*रेडीमेड copy मेसेज ची pdf file बनवणे*
     *यामध्ये Hike, Facebook and What's app वरील मेसेजची pdf file बनवणे याचा समावेश आहे.*
      *चला तर मग मी सांगतो तशी कृती करा.*
▶  *1) सर्व प्रथम तुम्ही what's app, hike, Facebook वरील मेसेज कॉपी करून घ्या.*

▶  *2) आता बाहेर पडून मोबाईल स्क्रीन वरील WPS office ओपन करा. यामध्ये तुम्हाला Recent, Starred, Open, New असे options दिसतील त्यापैकी New वर टच करा.*

▶  *3) आता यामध्ये Document, Memo, Presentation, Spreadsheet असे options दिसतील.त्यामधील Documents ला टच करा.*

▶  *4) आता नवीन page दिसेल.त्यावर बोटाने थोडा वेळ touch करा. Paste options येईल. Paste ला टच करा. आपण COPE केलेला मेसेज दिसेल.*

▶  *5)  आता त्या खाली Tools दिसेल त्याला टच करा.File मध्ये Export to pdf ला टच करा. आता तुम्हाला ही pdf file कोठे save करायची आहे त्यासाठी My Document, SD CARD, SD CARD (sd card 1) आणि Device असे option दिसतत. यामधील तुम्ही हवे ते निवडा. (मी SD CARD (sd card 1) निवडतो. कारण हे निवडले की फाईल आपल्या memory card वर save होते.)*

▶  *6)  त्यानंतर आपल्याला SD CARD मधील फोल्डर आणि खाली फाईल चे नाव दिसतात. पाहिजे ते फोल्डर निवडा व फाईलचे नाव टाका आणि खालील Exports to pdf ला टच करा. आपली फाईल 100% pdf मध्ये CONVERT झाली आहे.*

    *Ready made file  PDF मध्ये Convert होताना राहणारे दोष*
           
  *i) ही तुमची फाईल साध्या पद्धतीने pdf मध्ये convert झाली आहे. पण ही pdf मला पसंत नाही. कारण आपली ही फाईल  Ready-made  फाईल होती.*
  *ii) ती जशीच्या तशी pdf करताना File Font 11 राहतो. म्हणजे एकदम लहान. शिवाय आपल्याला पाहिजे तसा परिच्छेद मिळालेला नसतो.*
  *iii) अक्षरे bold नसतात. शिवाय अक्षरांना लुक नसतो. दोन ओळींच्या मध्ये जास्त अंतर राहते. म्हणजे जास्त जागा आणि कमी शब्द असे होते आणि प्रिंट पण हवी तशी मिळत नाही.*
  *iv) पेज साईज पण Letter असते ती A4 नसते.*
               🔯🔯🔯🔯🔯🔯🔯
          *मग यावर काही उपाय आहे की नाही?  तर आहे ना..... आपण Ready made फाईल copy करून paste केल्यावर direct pdf मध्ये Convert न करता अगोदर ती edit (दुरूस्त) करून घ्यायची आणि मग pdf मध्ये convert करायची. म्हणजे मग आपल्याला हवी तशी फाईल तयार करता येते.*
      *मग यासाठी कृती आहे ती खालीलप्रमाणे*

▶  *1) सर्व प्रथम तुम्ही what's app, hike, Facebook वरील मेसेज कॉपी करून घ्या.*

▶  *2) आता बाहेर पडून मोबाईल स्क्रीन वरील WPS office ओपन करा. यामध्ये तुम्हाला Recent, Starred, Open, New असे options दिसतील त्यापैकी New वर टच करा.*

▶  *3) आता यामध्ये Document, Memo, Presentation, Spreadsheet असे options दिसतील.त्यामधील Documents ला टच करा.*

▶  *4) आता नवीन page दिसेल.त्यावर बोटाने थोडा वेळ touch करा. Paste options येईल. Paste ला टच करा. आपण COPE केलेला मेसेज दिसेल.*
          *आता ही फाईल आपल्याला edit (दुरूस्त) करायची आहे.*

▶  *5) यासाठी खाली दिलेल्या Tools मधील View button ला टच करून page setup ला टच करा. यामध्ये Letter ला टच करून A4 साईज निवडा.त्यानंतर Orientation मधून Portrait म्हणजे उभे पेज किंवा Landscape म्हणजे आडवे पेज यापैकी तुम्हाला ते निवडा. Page margin मधून सर्व बाजूला छोटे बाण दिसतात. तुम्ही त्या बाणांनी हवी तशी मार्जिन करून घ्या. कोपर्‍यात OK button दिसते त्याला टच केले की आपले Page setup पूर्ण होते.*

▶  *6) View मध्येच page background ला टच केले की आपल्याला पेजचा background बदलण्यासाठी पाहिजे ते कलर उपलब्ध आहेत. योग्य तो कलर निवडून घ्या. Background कलर घेतलाच पाहिजे असे नाही. नाही घेतला तरी चालेल.*

▶  *7) आता आपल्याला font type बदलायचा आहे. त्यासाठी समोर दिसणार्‍या मेसेज मधील अगदी सुरुवातीच्या शब्दाजवळ बोटाने थोडा वेळ दाबून धरा. काही options दिसतील. यामधील Select all ला टच करा. आता पुन्हा खालील Tools ला टच करून त्यामधील Font ला टच करा. लगेच आपल्याला size 11 दिसेल. त्याला टच केले की आपल्याला हवी ती Font size निवडून घ्या. जर अक्षरे गडद रंगाची हवे असेल तर खालील B ला टच करा. तसेच तुम्हाला अक्षरांना खालील हवे ते effects निवडता येतील. ते दिले की कोपर्‍यात Done दिसेल त्याला टच करा. आता तुमची अक्षरे बदललेली दिसतील.*

▶  *8) मित्रांनो Tools मध्ये insert म्हणून एक टॅब आहे. यामधून तुम्हाला हवे ते चित्र घेण्यासाठी pictures option आहे. . तसेच आडवे उभे रकाने हवे असतील तर त्यासाठी Table पण आहे. तसेच header footer पण आहे.*

▶  *9) मेसेजमध्ये हवी तेवढी दुरूस्ती केल्यानंतर आपल्याला आता या मेसेज ची pdf file तयार करायची आहे.त्यासाठी खाली Tools दिसेल त्याला टच करा.File मध्ये Export to pdf ला टच करा. आता तुम्हाला ही pdf file कोठे save करायची आहे त्यासाठी My Document, SD CARD, SD CARD (sd card 1) आणि Device असे option दिसतत. यामधील तुम्ही हवे ते निवडा. (मी SD CARD (sd card 1) निवडतो. कारण हे निवडले की फाईल आपल्या memory card वर save होते.)*

     *विशेष सूचना - ज्या वेळी आपण done किंवा OK कराल त्यावेळी फाईल पूर्ण होत असते. अशा वेळी Tools मधील नवीन टॅब वापरायची गरज असेल तर पेज च्या कोपर्‍यात edit शब्दाला टच करा. लगेच तुम्हाला की बोर्ड उपलब्ध होईल.*
            *आहे की नाही सोप्पं...... आता तुम्ही मोबाईल PC ला connect करून तुम्ही Save केलेली फाईल PC, Laptop वर घेऊ शकता. किंवा मेमरी कार्ड काढून PC ला कनेक्ट करू शकता.*
                  @@ *फायदे* @@
        *मित्रांनो हल्ली Hike किंवा whatsapp वर जनरल नॉलेज चे बरेच प्रश्न आणि उत्तर येतात. English word येतात. समानार्थी, विरूद्ध अर्थाचे शब्द येतात. अशी आणि यापेक्षाही उपयुक्त माहिती दररोज येत असते. या माहितीची pdf file तयार करून त्याच्या प्रिंट काढून आपल्या वर्गातील मुलांना देता येईल. याशिवाय आपल्याकडे प्रचंड ज्ञानाचे भांडार होईल.*

     *याविषयी अजूनही काही शंका असल्यास नक्कीच विचारा.*
▶  *आपल्याला मोबाईल मधील WPS Office मधून pdf file बनवण्यासाठी माझ्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा.*
      🔵🔶🔵🔶🔵🔶🔵
        🙏 *आपलाच तंत्रस्नेही मित्र* 🙏
              *शिवाजी नवाळे सर*
                  *राहुरी अ'नगर*
      *प्रगत तंत्रस्नेही महाराष्ट्र समूह प्रमुख*
7⃣7⃣5⃣8⃣0⃣7⃣4⃣2⃣7⃣5⃣
  🔵🔶🔵🔶🔵🔶🔵🔶🔵
*(सर्व मित्रांना एक सूचना करावीशी वाटते की ही पोस्ट नाव कट न करता forward करावी. नाव कट करून पाठवले तर मित्रांना ज्या शंका येतील त्याचे निरसन होऊ शकणार नाही)*

Tuesday 13 September 2016

*सरल महत्वाचे* :
*दिनांक* :13/09/2016

*विषय* : *1) इयत्ता 1 ली वगळता इतर मुलांची जी  मागील वर्षी student पोर्टल ला नोंद झालेली नव्हती तसेच या वर्षी जी मुले नवीन दाखल झाली आहेत (परराज्यातील मुले/ वयानुरूप दाखल मुले/readmission) त्यांची माहिती भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्याबाबत* ..

*2)student पोर्टलच्या सर्व प्रकारच्या  कामासाठी अंतिम मुदत दिल्याबाबत*

*संदर्भ* : *मा. डॉ.सुनिल मगर साहेब, अध्यक्ष,ई-गव्हर्नन्स,महाराष्ट्र राज्य तथा संचालक, बालभारती, पुणे यांनी भ्रमनध्वणीवरील दिलेल्या सूचना* ...

             *सूचना क्रमांक : 1*

सन 2015-16 मध्ये आपण सरल मध्ये आपल्या विद्यार्थ्याची माहिती भरलेली आहे,ही माहिती भरत असताना अनावधानाने काही विद्यार्थ्याची नोंद सरल ला करायची राहून गेलेली आहे.सन 2016-17 या वर्षी फक्त 1 ली च्या नवीन मुलांची माहिती offline पद्धतीने सरल मध्ये नोंदवण्याची सुविधा यापूर्वीच उपलब्ध करून दिली आहे.परंतु मागील वर्षीचे राहिलेले विद्यार्थी आणि या वर्षी नव्याने दाखल झालेले इतर वर्गातील मुले *(परराज्यातील मुले/ वयानुरूप दाखल मुले/readmission)* या मुलांची माहिती भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचे आलेली आहे याची नोंद घ्यावी.ही सुविधा beo लॉगिन द्वारे शाळेला उपलब्ध करून दिली जाणार आहे.जर आपल्या शाळेत असे विद्यार्थी नोंद करावयाचे राहिले असतील तर आपण आपल्या गटशिक्षणाधिकारी म्हणजेच beo लॉगिन ला विनंती करावी की ही सुविधा आमच्या शाळेला उपलब्ध करून द्यावी. त्यानंतर गटशिक्षणाधिकारी सदर शाळेला ही सुविधा देणे गरजेचे आहे किंवा नाही याची शहानिशा करतील आणि *खात्री करून* ती सुविधा आपल्या लॉगिन मधून उपलब्ध करून देतील,तशी सुविधा beo लॉगिन ला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.त्यानंतर ती शाळा त्यांच्याकडे असणाऱ्या कोणत्याही वर्गातील मुलांची माहिती ही online भरू शकतील याची नोंद घ्यावी. *गटशिक्षणाधिकारी आपल्या लॉगिन मधून एका वेळेला केवळ 10 शाळेलाच ही परवानगी देऊ शकतील* .ज्या शाळेला परवानगी दिली जाईल त्या शाळेला beo यांनी दिलेल्या विहित वेळेत ते काम पूर्ण करावयाचे आहे.किती तारखेपासून किती तारखेपर्यंत ही सुविधा त्या त्या शाळेला असेल हे beo त्या शाळेला परवानगी देताना ठरवू शकतील,तसे option त्यांच्या लॉगिन ला उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.शाळेला अशी माहिती भरण्यासाठी किती काळ द्यावा हे beo यांनी काळजीपूर्वक ठरवावे जेणेकरून आपल्या कार्यक्षेत्रात सर्व शाळेची माहिती ही *दिनांक 19 सप्टेंबर 2016* पर्यंत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करावयाची आहे याची गामभीर्याने नोंद घ्यावी.अशा प्रकारे beo यांनी त्वरित या सुविधेचा उपयोग करून आपल्या कार्यक्षेत्रातील अशा शाळांना ही सुविधा शहानिशा करून उपलब्ध करून द्यावी.Beo login मधून सदर काम कसे करायचे याबाबत चे *मराठी मॅन्युअल* आमच्या havelieducation.blogspot.in या ब्लॉग ला उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.कृपया या ब्लॉग ला भेट द्यावी.

✅ही सुविधा शुक्रवार *दि.8 सप्टेंबर 2016* पासून beo लॉगिन ला टेस्ट करण्यासाठी उपलब्ध करून दिलेली होती.अद्याप या सुविधेचा वापर करावा अशा सूचना दिली गेलेली नव्हती.आजपर्यंत ही सुविधा फक्त टेस्ट करण्यासाठी होती.परंतु आज या सुविधेचा उपयोग beo आणि शाळांनी  करण्यासाठीच्या सूचना आज या पोस्ट द्वारे *मा. डॉ.मगर साहेब,अध्यक्ष,ई-गव्हर्नन्स, महाराष्ट्र राज्य तथा संचालक,बालभारती,पुणे* यांच्याकडून सर्वांना दिल्या जात आहे.तरी सर्व beo यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील शाळांकडून सदर माहिती पूर्ण करून घ्यावी.

✅सदर सुविधा ही टेस्ट करण्यासाठीच्या काळातच काही शाळांनी Beo यांची पूर्वपरवानगी न घेता इतर वर्गाची माहिती भरण्याचा प्रयत्न केला आहे.validation चे काम सुरु असल्याने अशी माहिती भरता येणे शक्य होत होते.परवानगी नसताना अशी भरलेली माहिती सिस्टिम कडून स्वीकारली जाणार नाही आणि इतर online कामासाठी सदर माहिती रिजेक्ट केली जाईल याची नोंद घ्यावी.तसेच *कोणतीही सूचना नसताना आणि वरिष्ठ लॉगिन ची परवानगी नसताना अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने माहिती भरणाऱ्यावर कारवाई करण्यात येईल* याची गांभीर्याने नोंद घ्यावी.


              *सूचना क्रमांक :2*

सन २०१६-१७ ची संचामान्यता ही *३० सप्टेंबर २०१६*  च्या school आणि student पोर्टल माहितीच्या आधारे करण्याचे निश्चित झालेले आहे.तरी सर्व व्यवस्थापनामधील सर्व शाळांना सूचित करण्यात येत आहे की *दिनांक १९/०९/२०१६ ही student पोर्टल माहिती भरण्यासाठी अंतिम मुदत देण्यात आलेली आहे* .

✅ *student पोर्टल मधील विद्यार्थी माहिती ट्रान्स्फर करणे*

✅ *इयत्ता ९ ते १२ च्या विद्यार्थ्यांचे प्रमोशन करणे*

✅ *सर्व मुलांचे आधार नंबर भरणे*

✅ *इयत्ता १ ली च्या नविन मुलांची माहिती भरणे*

✅ *विद्यार्थ्यांच्या तुकड्या update करणे*

✅ *विद्यार्थ्यांची चुकलेली माहिती दुरुस्थ करणे*

 या सर्व बाबी *दिनांक १९/०९/२०१६* ही अंतिम मुदत देण्यात येत आहे अशी सुचना *डॉ.मा.सुनील मगर साहेब,अध्यक्ष ई-गव्हर्नन्स,महाराष्ट्र राज्य,संचालक,बालभारती,पुणे*  यांच्याकडून यापूर्वीच देण्यात आलेल्या आहेत.आपल्या अपूर्ण माहतीमुळे सन २०१६-१७ च्या संचमान्यता मध्ये अडचण निर्माण झाल्यास यासाठी आपण सर्वस्वी जबाबदार असाल याची नोंद घ्यावी.

✅Student पोर्टल मध्ये काम करत असताना आपणास काही अडचण निर्माण होत असेल तर ती अडचण सविस्तर मांडण्यासाठी
खालील लिंक वर क्लीक करा आणि student पोर्टल मधील येणाऱ्या समस्यां सविस्तर कळवा.

http://goo.gl/9vBAQ8

✏राज्यस्तरीय whatsapp ग्रुप मध्ये add होण्यासाठी महत्वाचे :

आम्ही सरल संदर्भातील अडचणी सोडवण्यासाठी राज्यस्तरीय whatsapp चे   ग्रुप तयार केलेले आहेत.या ग्रुप मध्ये फक्त कोणत्याही शैक्षणिक ग्रुपचे admin अथवा सरल चे cluster अथवा तालुका स्तरावर काम करणारे मार्गदर्शक सहभागी होऊ शकतात. यासाठी http://havelieducation.blogspot.in
या ब्लॉग वर व्हाट्सएप्प समुहात सामिल होण्यासाठी एक फॉर्म देण्यात आलेला आहे त्या फॉर्म मध्ये मध्ये विचारलेली आपली माहिती आणि व्हाट्सएप्प मोबाइल क्रमांक  भरून आम्हाला ऑनलाइन पाठवा.आपणास यथावकाश ग्रुप मध्ये add करुन घेतले जाईल व वेळोवेळी आपणास सरल बाबत माहिती पाठवली जाईल.
*(सुचना : या ग्रुपवर सरल व्यतिरीक्त कोणतीही माहिती दिली जाणार नाही अथवा या ग्रुप वर सरल व्यतिरिक्त कोणतीही post टाकण्यास परवानगी नाही आहे याची नोंद घ्यावी.)*

 आपणास सरल बाबत असलेल्या अडचणी ईमेल,व्हाट्सएप्प वर कळवाव्या,त्या सोडवन्यात येईल.अडचणी कळवन्यासाठी ईमेल :
a) Sanchmanyata@gamil.com
b) idreambest@gmail.com  किंवा
c)support.education@maharashtra.gov.in

*धन्यवाद*
*प्रदीप भोसले*
*हवेली,पुणे*
Mobile no. : *9404683229*
 (Dont call,only whatsapp message)
Email: *idreambest@gmail.com*
Blog: havelieducation.blogspot.in

Monday 5 September 2016

*सुवर्ण महोत्सवी आदिवासी शिष्यवृत्ती*

🔰🔰🔰🔰🔰🔰🔰

*सर्व मुख्याध्यापकांना विनंती कि आपल्या शाळेतील ST (अ.जमाती.) विद्यार्थ्यांचे सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्तीचे प्रस्ताव शाळास्तरावर पूर्ण करून घ्यावेत*


*त्यासाठी आवश्यक कागदपत्र*

📑📑📑📑📑📑📑📑

💠तलाठी यांचा उत्पन्नाचा दाखला

💠विद्यार्थी व वडिलांचा रहिवासी दाखला

💠विद्यार्थ्यांचे आधारकार्ड

💠विद्यार्थ्यांचे राष्ट्रीयकृत बँकेतील खाते पासबुकची xerox

💠दोन पासपोर्ट साईझ फोटो

✅ *तीन अपत्य असणाऱ्या पालकांचे स्वलिखित प्रतिज्ञापत्र(फक्त दोनच अपत्यांना लाभ घेणे बाबत)*

वरील १ ते ५ प्रमाणे कागदपत्र  शाळेत जमा करून घेऊन ऑनलाइन प्रस्ताव सादर करावे.

👉🏼 *बँकेचे खाते शक्यतो विद्यार्थ्यांचे असावे किंवा विद्यार्थी आणि आई/वडील यांचे संयुक्त खातेअसावे.*

Online फॉर्म भरण्यासाठी लिंक

👇🏼👇🏼👇🏼👇🏼N👇🏼👇🏼👇🏼👇🏼

https://etribal.maharashtra.gov.in/evikas/main/common/aboutevikas.aspx

🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

Saturday 3 September 2016

*सरल महत्वाचे* :
*दिनांक : 02/09/2016*
(कृपया ही माहिती सर्वाना share करा)

*शाळा पोर्टल* :
1) आज पासून स्कूल पोर्टल ची माहिती भरण्यासाठीची online आणि ऑफलाईन  सुविधा  औरंगाबाद  विभागासाठी उपलब्ध करून दिली आहे याची नोंद घ्यावी.आणि पुढील 2 दिवसात संपूर्ण राज्यासाठी लॉगिन उपलब्ध केले जाणार आहे.शाळा पोर्टल माहिती भरण्यासाठी *15 सप्टेंबर 2016* ही राज्यातील संपूर्ण जिल्ह्यांसाठी अंतिम मुदत आहे.या वर्षीची संचमान्यता या माहीन्याअखेर करावयाची असल्याने सदर काम प्राधान्याने करावयाचे आहे म्हणून आपणास मुदत वाढ दिली जाणार नाही याची नोंद घ्यावी.

2)ऑफलाईन माहिती भरताना कशा पद्धतीने भरावी याबाबत  सविस्तर मार्गदर्शन व *मराठी manual*  आमच्या havelieducation.blogspot.in या ब्लॉग ला उपलब्ध करून दिलेले आहे.

3)ऑफलाईन माहिती भरत असताना ही माहिती फक्त internet explorer या browser मध्येच भरायची आहे,यासाठी mozilla अथवा crome या ब्राऊजर चा उपयोग करू नये.तसेच Internet explorer चे व्हर्जन हे 9 च्या पुढचे असावे.अन्यथा software काम करणार नाही याची नोंद घ्यावी.

4) ऑफलाईन माहिती भरताना डाउनलोड केलेल्या file या c ड्राईव्ह मध्ये न ठेवता D ड्राईव्ह मध्ये save करावी आणि मगच extract करावी,अन्यथा आपण भरत असलेली माहिती save होणार नाही किंवा माहिती भरत असताना software योग्य पद्धतींने काम करणार नाही याची नोंद घ्यावी.

5)आपण ऑफलाईन पद्धतीने माहिती भरल्यानंतर योग्य पद्धतीने भरलेल्या स्क्रीन या सरळ केंद्रप्रमुखाच्या लॉगिन ला verification साठी उपलब्ध होईल याची नोंद घ्यावी.ज्या स्क्रीन चूकतील त्या मुख्याध्यापक लॉगिन ला दूरस्थ करण्यासाठी उपलब्ध असतील

6) ज्या शाळेत इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही अशा शाळेस माहिती भरण्यासाठी ऑफलाईन सुविधा उपलब्द्ध केलेली आहे.अशा शाळा आपल्या केंद्रप्रमुखाकडून किंवा गटशिक्षणाधिकारी यांच्याकडून  ऑफलाईन माहिती  भरावयाचे सॉफ्टवेअर उपलब्ध करून घेतील.त्यांनी ते उपलब्ध करून द्यायच्या सूचना वरिष्ठ पातळीवरून देण्यात आलेल्या आहेत.

7) स्कूल पोर्टल ची ऑफलाईन माहिती भरताना काही अडचण येत असेल तर आपण आमच्या havelieducation.blogspot.in या ब्लॉग ला भेट द्या.तेथे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलेले आहे.

8) शाळा माहिती ऑफलाईन भरताना इंटरनेट explorer मधील काही सेटिंग change कराव्या लागतात.सेटिंग काय असाव्या या जाणून घेण्यासाठी माझ्या ब्लॉग ला भेट द्या. आपली शाळांची माहिती भरून झाल्यावर इंटरनेट  explorer सेटिंग security कारणास्तव पुन्हा आहे तशी म्हणजे डिफॉल्ट करून घेणे गरजेचे आहे याची नोंद घ्यावी.

*MDM पोर्टल* :

9) मागील दिवसांची माहिती भरण्याची सुविधा मुख्याध्यापकासाठी बंद केलेली आहे,परंतु पुढील 10 दिवस ही सुविधा केंद्रप्रमुख आणि गटशिक्षणाधिकारी यांच्या लॉगिन ला उपलब्ध आहेत याची नोंद घ्यावी.

10)MDM पोर्टल मध्ये माहिती भरण्यासाठी नाविन updated  अँड्रॉईड मोबाईल अँप्लिकेशन उपलब्ध करून दिलेले आहे.जुने अँप्लिकेशन मधून पुढील 10 दिवस माहिती भरू शकाल.नंतर ते अँप्लिकेशन बंद केले जाणार आहे.तरी नवीन अँप्लिकेशन त्वरित इन्स्टॉल करा.हे अँप्लिकेशन mdm च्या पोर्टल ला download करण्यासाठी live उपलब्ध करून दिलेले आहे.

11)mdm मध्ये भरलेल्या माहितीच्या आधारे सन 2016-17 च्या प्रत्येक महिन्याचे पोषण आहार बिल तयार केले जाणार आहे.त्यामुळे माहिती भरताना आपण रोजच्या रोज भरली जाईल याची नोंद घ्यावी.

12) पोषण आहार अँप्लिकेशन मध्ये *मास्टर रीलोड* नावाची एक नवीन टॅब उपलब्ध करून दिलेली आहे.त्याद्वारे आपण या सिस्टिम मध्ये जे नवीन ऑप्शन add केले जातील ते मोबाईल अँप्लिकेशन मध्ये या ऑप्शन द्वारे वापरकर्ते update करू शकणार आहे याची नोंद घ्यावी.

*विद्यार्थी पोर्टल* :
13)इयत्ता पहिलीच्या मुलांची माहिती भरण्याची संपूर्ण राज्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहे याची नोंद घ्यावी.तरी सर्वांनी ही माहिती त्वरित भरून घ्यावी.

14)सरल मध्ये ज्या मुलांचे आधार नंबर मागील वर्षी भरलेले नाही अथवा ज्या मुलांचे भरले होते पण UID department कडून verify करताना invalid म्हणून सांगितले गेले तसेच या वर्षीचे इ.१ लीचे नविन मुलांचे आधार कार्ड ही सर्व माहिती दिनांक 09 सप्टेंबर २०१६ ला केंद्र शासनाच्या UID department ला त्वरीत सादर करावयाची असल्याने आपल्या शाळेतील मुलांची आधार माहिती प्राधान्याने दिलेल्या मुदतीत भरावयाची आहे याची नोंद घ्यावी.

15)काही शाळांनी मागील वर्षी तुकडी तयार केलेली होती आणि पुन्हा डिलिट केली होती व  पुन्हा तयार केली होती ,तसेच काही शाळांनी काही तुकड्यांचे नाव A, B तर काही तुकड्यांचे नाव 1,2 असे दिले होते.तर अशा शाळांसाठी ऑटो प्रमोशन होताना समस्या निर्माण  झालेल्या आहे.अशा शाळांतील त्या  तुकडीमधील  संपूर्ण विद्यार्थी पुढील वर्गात दिसत नाही आहे ही समस्या आज सकाळी सोडवण्यात आलेली आहे.अशा शाळांच्या बाबतीत इयत्ता 1 ली ची नवीन विद्यार्थी माहिती भरतांना division create करण्यासंदर्भातचा error सिस्टिम कडून दाखवला जात आहे म्हणजेच ज्या शाळांच्या नवीन मुलांची माहिती भरण्याबाबत असा error येत आहे अशा शाळांनी ही समस्याच कशा पद्धतीने दूर करावी याबाबत सविस्तर माहिती आमच्या havelieducation.blogspot.in या ब्लॉग ला आज सायं 9 नंतर माहिती उपलब्ध करून दिली जाईल.आपण सदर ब्लॉग ला भेट द्यावी.

16) या वर्षीपासून तुकडी तयार करताना अक्षरांचा वापर न करता अंकांचा वापर करावा म्हणजेच A,B असे न करता 1,2 असे करावे.

17)ज्या शाळांमध्ये चुकून एकापेक्षा अधिक जनरल रजिस्टर निर्माण झालेले आहे अशा शाळांना ते रजिस्टर update करण्याची सुविधा दिली जाणार आहे.तसेच नवीन रजिस्टर निर्माण करण्यासाठीची सुविधा ही फक्त नवीन शाळांना निर्माण करण्यासाठी दिली जाणार आहे.

18) सध्या फक्त इयत्ता 1 लीच्या मुलांचीच माहिती भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.मागील वर्षी नोंद करायचे राहिलेले विद्यार्थी तसेच या वर्षी आपल्या शाळेत बाहेरच्या राज्यातील  पहिली वगळता इतर वर्गामध्ये आलेले विद्यार्थी यांची नोंद करण्याची सुविधा लवकरच उपलब्ध करुं दिलेली जाणार आहे.परंतु ज्या शाळेचे विद्यार्थी भरायचे आहे त्यांना ही सुविधा न देता त्या शाळेच्या गटशिक्षणाधिकारी यांच्या लॉगिन ला उपलब्ध करून दिली जाणार आहे.गटशिक्षणाधिकारी खात्री करून त्या मुलांची माहिती भरायची किंवा कसे याबाबत निर्णय घेतील.

19) *student पोर्टल मध्ये आलेल्या कोणत्याही समस्या कळवण्यासाठीची लिंक* : http://goo.gl/9vBAQ8

सदर लिंक वर क्लीक करून  कळवलेले प्रॉब्लेम प्राधान्याने सोडवले जातात त्यामुळे समस्या असेल तर त्वरित कळवा.

20) आजपासून student पोर्टल ला रिपोर्ट मध्ये संपूर्ण वर्गाची विद्यार्थी लिस्ट दाखवण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेलवे आहे.आगोदर आपणास फक्त तुकडीनिहाय विद्यार्थी माहिती पहाता येत होती आता संपूर्ण तुकड्यांची  माहिती एका क्लीक वर मिळू शकणार आहे.

21) ✏राज्यस्तरीय whatsapp ग्रुप मध्ये add होण्यासाठी महत्वाचे :

आम्ही सरल संदर्भातील अडचणी सोडवण्यासाठी राज्यस्तरीय whatsapp चे   ग्रुप तयार केलेले आहेत.या ग्रुप मध्ये फक्त कोणत्याही शैक्षणिक ग्रुपचे admin अथवा सरल चे cluster अथवा तालुका स्तरावर काम करणारे मार्गदर्शक सहभागी होऊ शकतात. यासाठी http://havelieducation.blogspot.in
या ब्लॉग वर व्हाट्सएप्प समुहात सामिल होण्यासाठी एक फॉर्म देण्यात आलेला आहे त्या फॉर्म मध्ये मध्ये विचारलेली आपली माहिती आणि व्हाट्सएप्प मोबाइल क्रमांक  भरून आम्हाला ऑनलाइन पाठवा.आपणास यथावकाश ग्रुप मध्ये add करुन घेतले जाईल व वेळोवेळी आपणास सरल बाबत माहिती पाठवली जाईल.
(सुचना : या ग्रुपवर सरल व्यतिरीक्त कोणतीही माहिती दिली जाणार नाही अथवा या ग्रुप वर सरल व्यतिरिक्त कोणतीही post टाकण्यास परवानगी नाही आहे याची नोंद घ्यावी.)

 22) आपणास सरल बाबत असलेल्या अडचणी ईमेल,व्हाट्सएप्प वर कळवाव्या,त्या सोडवन्यात येईल.अडचणी कळवन्यासाठी ईमेल :
a) Sanchmanyata@gamil.com
b) idreambest@gmail.com  किंवा
c)support.education@maharashtra.gov.in  

*धन्यवाद*
*प्रदीप भोसले*
*हवेली,पुणे*
Mobile no. :9404683229
 (Dont call,only whatsapp message)
Email: idreambest@gmail.com
Blog: havelieducation.blogspot.in
Apps link of my blog's for download : Www.appsgeyser.com/2460364