Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu
जि.प.केंद्रीय उच्च प्राथमिक मराठी कन्या शाळा विडूळ तर्फे आपले ब्लॉगवर हार्दिक स्वागत! ब्लॉगचे काम चालू आहे भेटीबद्दल धन्यवाद !

Saturday 27 February 2016

Video निर्मिती

♍🅰🅿📲♍🅰🅿📲♍🅰🅿
व्हिडिओ एडिटर्स नांदेड

व्हिडिओ एडिटिंग (संपादन) व्याख्या :
व्हिडिओ एडिटिंग हि एक अशी प्रक्रिया आहे ज्या मध्ये व्हिडिओ आणि ऑडिओ या दोनीही गोष्टींना आवश्यकतेनुसार बदलुन आणि त्यांचा पाहिजे तसा क्रम ठरवून एक फायनल आउटपुट तयार केले जाते.
व्हिडिओ एडिटिंग चा अर्थ फार गहन असला तरी साध्य आणि सरळ भाषेत आपण त्याला खालील प्रक्रिया करण्याची पद्धत म्हणू शकतोत.

व्हिडिओ किंवा ऑडिओ क्लिप add किंवा remove करणे, त्यांचा sequence अर्थात क्रम बदलणे, नको असणारा पार्ट काढून टाकणे इ.

कलर correction करणे, transition add करणे, filter add करणे व titles add करणे इ.
आपण व्हिडिओ आणि ऑडिओ या दोघांना एकत्रित पणे footage हा शब्द वापरू शकतो.
एकंदरीत व्हिडिओ एडिटिंग चे उद्देश खालीलप्रमाणे सांगता येतील.
आपण व्हिडिओ आणि ऑडिओ या दोघांना एकत्रित पणे footage हा शब्द वापरू शकतो.

एकंदरीत व्हिडिओ एडिटिंग चे उद्देश खालीलप्रमाणे सांगता येतील.
1) नको असलेली footage काढून टाकणे
2) योग्य ती footage निवडणे
3) योग्य transition, titles, audio, music आणि filters वापरणे
4) विशिष्ट वातावरण निर्माण करणे फिल्टर्स व effect वापरून
5) योग्य angle निवडणे (viewers/ प्रेक्षकांसाठी)
व्हिडिओ एडिटिंग चे काही प्रकार :

📹Film Slicing
हा सर्वात जुना प्रकार आहे ज्यात व्हिडिओ च्या फिल्म्स cut करून एकमेकांना जोडून हवा तसा sequence तयार केला जायचा. जुन्या काळातील फिल्म्स अशाच प्रकारे edit केल्या जायच्या. आत्ता हि पद्धत वापरात नसली तरी यामुळेच आपण आजच्या डिजिटल computerised एडिटिंग पर्यंत पोहोचलोत.

📹Linear Video Editing
हा एडिटिंग चा प्रकार इलेक्ट्रॉनिक व्हिडिओ tapes एडिट करण्यासाठी 1990 च्या अगोदर वापरला गेला. यानंतर computers बाजारात उपलब्ध झाले आणि डिजिटल एडिटिंग चे युग सुरु झालं ज्याला आपण Non-Linear Editing असे म्हणून ओळ्खतोत. या एडिटिंग च्या प्रकारात व्हिडिओ sequence एका व्हिडिओ टेप मधून दुसऱ्या व्हिडिओ टेप मध्ये ट्रान्सफर केला जायचा. यासाठी कमीत कमी दोन vcr आणि एक टीव्ही लागते. हा सर्वात जास्त काळ वापरला गेलेला प्रकार असून आजही काही जागी हा प्रकार वापरात असल्याचे दिसून येते. यातील पहिला vcr source म्हणून वापरतात तर दुसरा vcr रेकॉर्डर म्हणून वापरतात.

📹Non-Linear Video Editing
या प्रकारालाच आपण डिजिटल किंवा computerised व्हिडिओ एडिटिंग असे म्हणतात. या प्रकारात संपूर्ण व्हिडिओ कॉम्पुटर हार्ड ड्राईव्ह वर सेव्ह करून त्याला विशिष्ठ software च्या मदतीने हवे तसे एडिट केले जाते. एडिटिंग पूर्ण झाल्यावर व्हिडिओ हा cd/dvd वर रेकॉर्ड केला जातो. या प्रकारचे फायदे खालील प्रमाणे आहेत :
1. हि सर्वात फ्लेक्सिबल मेथड आहे, कारण हवा तो पार्ट आपण कधीही आणि केव्हाही एडिट करू शकतो.
2. हा सर्वात फास्ट प्रकार आहे एडिटिंग चा.
3. हजारो इफेक्ट्स आणि विडिओ स्टॅण्डर्डस यात उपलब्ध आहेत. उदा. MP4, DVD, HD etc...
📹4. हा प्रकार शिकण्यासाठी सोपा आणि अद्ययावत आहे.
Live Video Editing
या प्रकारात एकापेक्षा जास्त कॅमेरे एका मध्यवर्ती router ला जोडून वेगवेगळे angles शूट करून on the spot एडिटिंग केली जाते. टीव्ही प्रोग्रॅम्स, live प्रोग्रॅम्स इ. हे या प्रकारचे उत्तम उदाहरण आहे.

📹मूळ लेखक : श्याम कापसे नांदेड  टीचर वेब डिजाईनर अँड विडिओ एडिटर

📱 technology फॉर टीचर्स📲

📞9890697966
कॉन्टॅक्ट फॉर जॉईन ♍🅰🅿