Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu
जि.प.केंद्रीय उच्च प्राथमिक मराठी कन्या शाळा विडूळ तर्फे आपले ब्लॉगवर हार्दिक स्वागत! ब्लॉगचे काम चालू आहे भेटीबद्दल धन्यवाद !

Wednesday 27 July 2016

⭐अल्पसंख्याक शिष्यवृत्ती मधील
महत्त्वाचे बदल⭐
वेबसाईट पाहण्यासाठी => Website search
इयत्ता १ली ते ८वी पर्यंत Offline Excel
Sheet मध्येच माहिती भरावी Online
भरू नये..
एक्सेल फाईल Upload होत नसेल तर या प्रमाणे
माहिती भरावी...
☆ www.scholarships.gov.in
website जाऊन ओपन करा त्यानंतर
☆ "Who am I?" वर जाऊन "institute" वर click करा
शाळेचा युजर आयडी व पासवर्ड टाका.
User Id - : UDISE CODE टाका
Password : guest123#
☆"Application Registration " मध्ये जाऊन
शाळेची माहिती भरा
☆"Upload Excel Data" वर क्लिक करा.
☆"Download Excel Data Format" वर क्लिक करा थोडे
खाली या एक्सेल फाईल .Download करा .
☆Exel Sheet मध्ये विद्यार्थ्यांची
माहिती खालीलप्रमाणे भरा...
रकाना नंबर ...
१) अनुक्रम नंबर
२) विद्यार्थ्याचे नाव आडनाव
नाव वडिलांचे नाव
३) वडिलांचे नाव वरिलप्रमाणे
४) जन्म दिनांक 03/05/2007
५) लिंग F / M
६) जात संवर्ग Code टाका
७) Aadhar No.(If Issued) आधार कार्ड असेल तर
८) Student Permanent Address(Mandal/Taluka/
Block
हा पत्ता आपल्याला Offline Registration वर क्लिक
केल्यानंतर Locate Mandal/Taluk/block मेनू दिसेल त्यावर
क्लिक करा State/District/Mandal :मधून आपला राज्य कोड
,जिल्हा कोड व तालुका कोड शोधा व भरा (Enter NSP Code )
NSP ने दिलेला
हा कोड National Scholarships Portal ने दिलेला आहे
कृपया याचा आणि यु डायस कोडचा संबंध लावू नका.
९) Student Permanent Address(District)
वरीलप्रमाणे
१०) Student Permanent Address(State)
वरीलप्रमाणे
११) Student Permanent Address
(PIN) पिन कोड नंबर गावाचा
१२) Class in which presently studying
(I,II,III,IV,V,VI,VII,VIII)
इयत्ता अंकात जसे 1 ,2……
13) Previous Year Marks Percentage
टक्केवारी मध्ये लिहा 82.00 /78.54
१४) Institution Code(Enter School Code Only) या
ठिकाणी सालेचा यु डायस कोड लिहा.
१५) Annual Parental Income वार्षिक उत्पन्न लिहा फक्त
अंक लिहा
१६) Hosteller/Dayscholar निवासी असेल तर H
व अनिवासी असेल तर लिहा D
१७) Bank Account No.
१८) IFSC code
१९) Name as in Bank Account
२०) If not in student's name relationship with
Account Holder(Either Father or Mother)
Mandatory ( In case of Joint Account with Father-
JF, Joint Account with Mother - JM, Joint
Account with Guardian-JG)
२१) Admission Fee फक्त अंकात लिहा 0
२२) Tution Fee फक्त अंकात लिहा 0
२३) Maintenance 1000 Allowance फक्त अंकात लिहा
२४) Total Scholarship 1000 Amount फक्त अंकात लिहा
२५)Religious_Minority(HINDU/MUSLIM/CHRISTIAN/
SIKH/PARSI/BUDDHIST/JAIN/OTHERS)
Mandatory ( Muslim-2, Christian-3,Sikh-4,Parsi-5,
Jain-6, Buddhists, Others-8)
वरीलप्रमाणे माहिती भराष व Upload
Excel Data" वर क्लिक करा आणि फाईल Upload करा.खुणा /
चिन्ह वापरून नका. Upload झाल्यावर HM यांनी
Verification करावे...
https:// www.scholarships.gov.in

Thursday 21 July 2016

*सरल महत्वाचे* :
*(student पोर्टल विशेष)*
*दिनांक : 20/07/2016*

१) *DUPLICATE student विषयी* : student पोर्टल मध्ये सर्वप्रथम DUPLICATE विद्यार्थी शोधण्याचे काम चालू करावे.सध्या WITHIN SCHOOL DUPLICATE विद्यार्थी शोधण्याची आणि delete करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.यासाठी HM ने आपले login करून फक्त DUPLICATE student tab वर क्लिक करावे.आणि जर आपल्या शाळेत विद्यार्थ्याची DUPLICATE म्हणजेच एकापेक्षा अधिक नोंद झालेली असेल तर अशा विद्यार्थ्यांची लिस्ट दिसेल त्यापैकी योग्य नोंद ठेऊन उरलेल्या नोंदी delete करावयाच्या आहेत याची नोंद घ्यावी.ज्या शाळेत विद्यार्थ्यांची DUPLICATE नोंद झालेली नाही आहे अशा शाळेच्या बाबतीत विद्यार्थ्यांची लिस्ट दिसून येणार नाही.यानंतर लवकरच WITHIN BLOCK आणि WITHIN DIST. मध्ये DUPLICATE विद्यार्थी BEO आणि EO यांच्या login मधून शोधण्याचे आणि delete करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.या ठिकाणी एक लक्षात घ्यावे की विद्यार्थी TRANSFER करण्यापूर्वी आपणास DUPLICATE student हे delete करावयाचे आहे.कोणत्याही परिस्थितीत शाळेत DUPLICATE विद्यार्थी नोंद राहणार नाही ही मुख्यध्यापकाची जबाबदारी आहे

*TRANSFER student विषयी* :

१) विद्यार्थी ट्रान्स्फर करण्याची REQUEST ही नविन शाळेच्या मुख्यध्यापकाने जुन्या शाळेच्या मुख्यध्यापकाला पाठवायची आहे.ही REQUEST पाठवत असताना आपण योग्य विद्यार्थ्यांच्या बाबतीत आणि योग्य शाळेलाच पाठवत आहोत का याची खात्री करून घेणे महत्वाचे आहे.बऱ्याचदा चुकीच्या मुलाची REQUEST पाठवली गेली आणि ती REQUEST चुकून कनफर्म झाल्याचे सुध्द्धा दिसून येते.तेंव्हा REQUEST  विचारपूर्वक पाठवावी ही विनंती.एकदा REQUEST पाठवली गेली की तो विद्यार्थी कन्फर्म अथवा reject होईपर्यंत इतर शाळेला REQUEST  लिस्ट मध्ये दिसत नाही याची नोंद घ्यावी.

२) विद्यार्थी REQUEST  केल्यावर सदर REQUEST ही जुन्या शाळेच्या मुख्याध्यापकाला कन्फर्म करण्यासाठी जाते.तेंव्हा सर्वप्रथम ही REQUEST कन्फर्म करण्यापूर्वी मुख्याध्यापकाने सदर REQUEST ही ज्या शाळेत मुल शिकायला गेले आहे त्याच शाळेची आहे किंवा नाही हे आलेल्या दाखला मागणी रजिस्टर वरून तपासून मगच REQUEST कन्फर्म करावी.अन्यथा चुकीच्या शाळेतून REQUEST आली असेल तर घाईत कन्फर्म होण्याची शक्यता नाकारता येत नाही.अशा चुका बर्याच शाळेच्या मुख्याध्यापकाकडून होत आहे.जेंव्हा REQUEST कन्फर्म होते त्यानंतर अशा मुलाना पुंन्हां return करण्याची सुविधा देण्यात आलेली नाही आहे.अशा चुकून कनफर्म झालेल्या केस मध्ये काय करावे हा प्रश्न आहे.अशा वेळी चुकीच्या शाळेला विद्यार्थी कन्फर्म झाला असेल तर त्या नव्या शाळेने म्हणजे ज्यांनी REQUEST केली होती अशा शाळेने तो विद्यार्थी १२३ असा कोणताही रजिस्टर नंबर आणि कोणतीतरी शाळेत प्रवेश तारीख आणि इयत्ता भरून विद्यार्थी update करून घ्यावा.आणि आता जुन्या म्हणजेच त्या विद्यार्थ्याच्या मुळ शाळेत ज्या शाळेत तो सध्या शिकत आहे अशा शाळेने पुन्हा या शाळेला नव्याने ट्रान्स्फर student साठीची REQUEST पाठवावी.आणि विद्यार्थी परत आपल्या शाळेत ट्रान्स्फर करून घ्यावा.

३)कधी कधी विद्यार्थी ट्रान्स्फर REQUEST पाठवताना जुन्या शाळेत विद्यार्थी दिसत नाही अशा वेळेला male,female,शेजारच्या वर्गामध्ये असे सर्च चे option वापरून शोधून पहावा.एवढे करूनही विद्यार्थी दिसून येत नसेल तर सदर विद्यार्थी शाळेत मागील वर्षी online माहिती मध्ये नोंदवला गेला नाही असे समजून जेंव्हा नविन विद्यार्थी add करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल तेंव्हा तो विद्यार्थी add करून घ्यावा.

४) कधी कधी विद्यार्थी ट्रान्स्फर REQUEST पाठवताना जुन्या शाळेत विद्यार्थी दिसत नाही परंतु मागील वर्षी त्या शाळेने त्या विद्यार्थ्यांची माहिती भरलेली आहे असे म्हणणे आहे आणि त्यांनी खरोखर ती भरलेली देखील आहे असे असताना काय करावे ही समस्या येत असेल तर हे लक्षात घ्या की मागील वर्षी *मायग्रेशन* tab चा वापर करून असे विद्यार्थी मायग्रेट झाले असल्याची शक्यता आहे.तरी अशा केस मध्ये पुढील सुचना येईपर्यंत वाट पहावी.आणि जेंव्हा असे विद्यार्थी दिसून येतील तेंव्हा नविन शाळेने REQUEST पाठवावी.त्या वेळी तशा सुचना देण्यात येतील याची नोंद घ्यावी,अन्यथा नविन विद्याथी add करण्याची सुविधा आपणास दिल्यानंतर आपणास सदर विद्यार्थी add करण्याचा पर्याय उपलब्ध असेलच.

५) विद्यार्थी ट्रान्स्फर करताना असे लक्षात आले की सदर विद्यार्थ्याची माहिती मध्ये काही चुका आहेत अशा वेळी काय करावे.तर अशा वेळे सदर विद्यार्थी माहिती थोडीफार चूक असली तरी तो विद्यार्थी ट्रान्स्फर करून घ्यावा आणि नंतर सेकंड फेज मध्ये ती सर्व माहिती दुरुस्थ करण्याची सुविधा आपणास उपलब्ध करून दिली जाणार आहे त्या वेळी असे विद्यार्थी दुरुस्थ करून घ्यावे ही विनंती.

६) विद्यार्थी ट्रान्स्फर करताना विद्यार्थ्यांची इयत्ताची नोंद चुकली आहे म्हणजेच विद्यार्थी भलत्याच इयत्तेत दिसून येत आहे किंवा इतर माहिती चुकली आहे अशा वेळी काय करावे.तर अशा चुका दुरुस्थ करण्यासाठी आपणास २ दिवसात इयत्ता व इतर बाबी update करण्यासाठीची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे,तेंव्हा त्वरीत सदर इयत्ता व इतर माहिती दुरुस्थ करून घ्यावी.

७) इयत्ता १ ते ८ वीच्या मुलांचे system द्वारे ऑटो प्रमोशन करण्यात आलेले आहे अशा वेळी ज्या शाळेने विद्यार्थी ऑटो प्रमोशन होण्याचा आधी ट्रान्स्फर केलेले आहेत असे सर्व विद्यार्थी चुकून *दोन वर्ग* पुढे गेल्याचे दिसून येत आहे अशा मुलांना पुन्हा एक वर्ग मागे आणावे लागणार आहे परंतु तशी सुविधा देण्यात आलेली नाही आहे अशा मुलांच्या बाबतीत अशा चुका दुरुस्थ करण्यासाठी आपणास २ दिवसात इयत्ता update करण्यासाठी एक सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे,तेंव्हा त्वरीत सदर इयत्ता दुरुस्थ करून घ्याव्यात.

८)या ठिकाणी हे लक्षात घ्या की विध्यार्थी माहिती मध्ये ज्या काय चुका झालेल्या असतील त्या चुका आपणास लवकरच दुरुस्थ करता येणार आहे.तशी सुविधा लवकरच उपलब्ध करून दिली जाणार आहे याची नोंद घ्यावी.

९)काही शाळेने जुन्या शाळेस विद्यार्थी ट्रान्स्फर करण्याची REQUEST पाठवली होती,तसेच जुन्या शाळेने ही REQUEST कन्फर्म देखील केली परंतु कन्फर्म होऊन आल्यावर त्या विद्यार्थ्यांना नविन मुख्याध्यापकाने update केले नाही  आणी त्याच काळात ऑटो प्रमोशन प्रक्रिया system द्वारे झाली त्यामुळे असे update न झालेले विद्यार्थी सदर शाळेच्या updation च्या लिस्ट मध्ये दिसत नाही आहे.अथवा ती लिस्ट open होत नाही आहे.अशा वेळी काय करावे याबाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी कृपया *havelieducation.blogspot.in*  या ब्लॉग ला भेट द्या तेथे सविस्तर सांगण्यात आलेले आहे.

१०)काही शाळेच्या बाबतीत अशा समस्या आहेत की त्यांच्या शाळेतील मुले ही ऑटो  प्रमोशन झालेली नाही आहे,ती मागील वर्षीच्याच वर्गात दिसत आहे .तरी अशा मुख्याध्यापकांनी हे लक्षात घ्यावे की विद्यार्थी नोंद करताना अथवा online अपलोड करताना आपल्या चुका झाल्या असतील अन्यथा system कडून ऑटो update मध्ये आपली शाळा राहणार नाही.तरी अशा शाळांनी अशा चुका दुरुस्थ करण्यासाठी आपणास २ दिवसात इयत्ता update करण्यासाठी एक सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे,तेंव्हा अशा ऑटो प्रमोशन न झालेल्या शाळांनी त्वरीत सदर इयत्ता दुरुस्थ करून घ्याव्यात.

११)जुन्या शाळेने नविन शाळेकडून आलेली REQUEST ७ दिवसात कन्फर्म केली नाही तर ती REQUEST *गटशिक्षणाधिकारी* login ला कन्फर्म अथवा reject करण्यासाठी automatic पाठवली जाते.या केस मध्ये विध्यार्थी माहिती चेक करून REQUEST कन्फर्म अथवा reject करणे हे काम खूप क्लिष्ट होऊन बसले आहे.अशा वेळी मुख्याध्यापकाच्या दुर्लक्षामुळे गटशिक्षणाधिकारी यांच्या login ला हजारोने REQUEST आल्या आहेत.आता मात्र यासाठी गटशिक्षणाधिकारी यांना जुन्या शाळेच्या मुख्याध्यापकाने कन्फर्म करायला हव्या होत्या परंतु ट्रेनिंग उशिरा झाले असेल अथवा माहिती नसल्याने अथवा दुर्लक्ष झाले असेल या आणि अन्य कारणामुळे request कन्फर्म केल्या नसेल त्या सर्व REQUEST पुन्हा कन्फर्म करण्यासाठी REQUEST return ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.या मध्ये गटशिक्षणाधिकारी हे आपल्या कार्यक्षेत्रातील cluster निहाय आलेल्या REQUEST return करू शकणार आहे.विशेष म्हणजे या REQUEST कन्फर्म,reject अथवा return करताना एकाच वेळी अनेक *(बल्क)* REQUEST कन्फर्म,reject अथवा return करता येण्याची सुविधा काल उपलब्ध करून देण्यात आलेली आहे याची नोंद घ्यावी.

१२)इयत्ता ९ ते १२ पर्यंतच्या शाळेत विद्यार्थ्यांचे pramotion हे system द्वारे न होता *manually* करावयाचे आहे याची नोंद घ्यावी.हे करत असताना एखाद्या विद्यार्थ्याला आपण प्रमोट केले की तो विद्यार्थी पुन्हा त्या लिस्ट मध्ये दुसऱ्या वेळी दिसून येत नाही.त्यानंतर आपण प्रमोट करताना आपण चुकलो आहोत असे लक्षात आले तर  *undo pramotion* च्या tab चा वापर करून आपण सदर विद्यार्थांना पुन्हा प्रक्रिया करण्यासाठी उपलब्ध करून घेऊ शकतात.तशी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

१३) काही शाळा या वर्षी सुरु झालेल्या आहेत अशा शाळांना अद्याप udise number उपलब्ध नसल्याने या शाळेत गेलेले विद्यार्थी सध्या ट्रान्स्फर होऊ शकणार नाही अथवा त्या नविन शाळा सदर शाळांना REQUEST पाठवू शकणार नाही.तरी अशा शाळांना सूचित करण्यात येते की अशा शाळांनी सध्या काळजी करू नये.लवकरच आपल्या बाबतीत धोरणात्मक निर्णय घेतला जाणार आहे.पुढील सुचना मिळेपर्यंत आपण वाट पहावी ही विनंती.

१४) इयत्ता ९ ते १२ वीच्या प्रत्येक शाळेने आपल्या शेवटच्या वर्गाचे देखील pramotion करावयाचे आहे.समजा आपल्याकडे १० वीचा शेवटचा वर्ग असेल तर अशा शाळांनी आपल्या १० वीचे विद्यार्थी हे ११ वीच्या *आभासी* वर्गात जे system द्वारे उपलब्ध करून दिलेले आहेत अशा वर्गात प्रमोट करावयाचे आहे.

१५)परराज्यात शिकण्यासाठी गेलेले विद्यार्ही,मयत विद्यार्थी तसेच शाळा सोडून गेलेले विद्यार्थी *(इयत्ता ९ वी ते १२ वी च्या बाबतीत )* या विद्यार्थ्यांची नावे system मधून कशी काढावयाची अथवा या बाबतीत काय कारायचे याबाबत लवकरच आपणास नव्याने सुचना देण्यात येणार आहे.तोपर्यंत अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत काळजी करू नये.

१६)परराज्यातून आलेले विद्यार्थीअथवा मागील वर्षी student पोर्टल ला नोंद न केले गेलेले विद्यार्थी *second फेज* मध्ये add करून घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी.

17) समजा एखादा विद्यार्थी A शाळेतून मागील वर्षी online नोंद झाल्यानंतर B शाळेत शिकायला गेला आहे आणि आता तोच विद्यार्थी पुन्हा A शाळेत शिकायला परत आलेला आहे *(readmition)* तर अशा केस मध्ये काय करावे ही समस्या बर्याच मुख्याध्यापकांना येत आहे.असा वेळी त्या विद्यार्थ्यास B शाळेत ट्रान्स्फर करून पुन्हा A शाळेत ट्रान्स्फर करायची गरज नाही आहे.second फेज मध्ये इयत्ता व इतर माहिती update करायची सुविधा दिल्यानंतर त्या विद्यार्थ्यांची दाखल तारीख आणि दाखल इयत्ता व जनरल रजिस्टर नंबर update करून घ्यावेत.

१८) समजा एखादा विद्यार्थी A शाळेतून मागील वर्षी online नोंद झाल्यानंतर B शाळेत शिकायला गेला आहे आणि आता नंतर पुन्हा तो C शाळेत शिकायला गेला आहे.तर ट्रान्स्फर कसे करावे.या परिस्थितीत B शाळेने A शाळेकडून विद्यार्थी ट्रान्स्फर करून घ्यावा आणि नंतर C  शाळेने तोच विद्यार्थी B शाळेकडून ट्रान्स्फर करून घ्यावा.या केस मध्ये तीनही मुख्याध्यापकाने सहकार्याची भूमिका पार पाडून विद्यार्थी माहिती लवकरात लवकर ट्रान्स्फर होईल असे पहावे.

19) काही पालक असे म्हणत असतात की आमच्या मुलाची प्रगती आम्हाला कमी वाटते तेंव्हा आमच्या मुलास या वर्षी नापास करा आणि याच वर्गात बसवा.अशा वेळी हे लक्षात घ्या की rte नुसार आपणास कोणत्याही विद्यार्थ्यास नापास करता येणार नाही.ऑनलाइन सिस्टिम मध्ये देखील तो विद्यार्थी  तुम्हाला मागील वर्गात दाखवता येणार नाही हे लक्षात घ्यावे.अशा वेळी पालकांना समजावे की या वर्षी त्याची आम्ही प्रगती विशेष लक्ष घालून करून घेऊ अशा वेगवेगळ्या पद्धतीने पालकांचे मतपरिवर्तन करावे ही विनंती. पालकाच्या आग्रहास्तव कोणत्याही विद्यार्थ्यास त्याच वर्गात ठेवता येणार नाही याची नोंद घ्यावी.

२०)ज्या शाळा बंद पडल्या आहेत अशा शाळेचे विद्यार्थी ट्रान्स्फर करण्याची जबाबदारी त्या तालुक्याच्या *गटशिक्षणाधिकारी* यांची असेल याची नोंद घ्यावी.

२१) कोणत्याही MEDIUM चा विद्यार्थी हा कोणत्याही medium मध्ये प्रवेश घेऊ शकेल आणि  ट्रान्स्फर होऊ शकेल.विद्यार्थी update करताना तशी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

22)student पोर्टल एकाच वेळी महाराष्ट्रातील सर्व शाळांना ओपन करून डोके असल्याने user ची संख्या अधिक झालेली आहे यामुळे कधी कधी student पोर्टल ला user ची संख्या वाढल्याने site स्लो होण्याचा अनुभव सर्वाना येत आहे तरी अशा वेळी थोडा संयम ठेवून काम करावे तसेच आपले काम संपल्यावर logout करायला विसरू नये.आपण logout केल्याने सिस्टिमवर आलेला लोड एका user ने कमी होण्यास मदत मिळेल याची नोंद घ्यावी.

23) ज्या शाळेत नवीन वर्ग अथवा तुकडी निर्माण झालेली आहे अशा शाळांना तो नवीन वर्ग आणि तुकडी add करण्याची सुविधा master या ऑप्शन मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे याची नोंद घ्यावी.यासंदर्भात अधिक माहिती आमच्या havelieducation.Blogspot.in  ब्लॉग ला भेट द्या.

24) मागील शैक्षणिक वर्षांमध्ये भरलेली 1 ते 8 वी च्या विद्यार्थ्याची  माहिती सिस्टिम द्वारे ऑटो अपडेट केलेली आहे.म्हणजेच आता मागील वर्षी माहिती भरलेला विद्यार्थी आपणास जर 1 ली ला असेल तर तो आता 2 री ला दिसून येणार आहे.याचाच अर्थ असा की स्टुडंट ट्रान्सफर करताना आतापर्यंत आपण एखाद्या विद्यार्थ्याला मागच्या वर्षीच्या वर्गात ट्रान्सफर request करण्यासाठी  शोधत होतो ते आता मागच्या वर्गात न शोधता चालू वर्षीच्या वर्गात शोधावे लागणार आहे याची नोंद घ्यावी.परंतु इयत्ता 9 वीच्या पुढील मुलांचे प्रमोशन हे मॅन्युअली करावे लागणार आहे.अशा शाळेत विद्यार्थी ट्रान्सफर request करताना पुढील शाळेने प्रमोशन केले असेल तर चालू वर्गात त्या विद्यार्थ्याला शोधावे अन्यथा मागील वर्षीच्या इयत्तेमध्ये त्या मुलाला शोधावे लागेल ही बाब लक्षात ठेवावी.

25) सरल संदर्भात कोणत्याही अडचणी आल्यास आमच्या havelieducation.blogspot.in या ब्लॉग ला भेट द्या.त्या ठिकाणी आपल्या सर्व अडचणी दूर करण्यात येईल.तेथे दिलेल्या विविध online google फॉर्म च्या मदतीने आपण आम्हाला आपल्या येणाऱ्या समस्या लेखी स्वरूपात सांगू शकाल.तसेच आपण ९४०४६८३२२९ या whatsapp क्रमांकावर देखील message पाठवू शकता (call करू नये ).

26)✏ *राज्यस्तरीय whatsapp ग्रुप मध्ये add होण्यासाठी महत्वाचे* :

आम्ही सरल संदर्भातील अडचणी सोडवण्यासाठी राज्यस्तरीय whatsapp चे   ग्रुप तयार केलेले आहेत.या ग्रुप मध्ये फक्त कोणत्याही शैक्षणिक ग्रुपचे admin अथवा सरल चे cluster अथवा तालुका स्तरावर काम करणारे मार्गदर्शक सहभागी होऊ शकतात. यासाठी *http://havelieducation.blogspot.in*
या ब्लॉग वर व्हाट्सएप्प समुहात सामिल होण्यासाठी एक फॉर्म देण्यात आलेला आहे त्या फॉर्म मध्ये मध्ये विचारलेली आपली माहिती आणि व्हाट्सएप्प मोबाइल क्रमांक  भरून आम्हाला ऑनलाइन पाठवा.आपणास यथावकाश ग्रुप मध्ये add करुन घेतले जाईल व वेळोवेळी आपणास सरल बाबत माहिती पाठवली जाईल.
( *सुचना* : या ग्रुपवर सरल व्यतिरीक्त कोणतीही माहिती दिली जाणार नाही अथवा या ग्रुप वर सरल व्यतिरिक्त कोणतीही post टाकण्यास परवानगी नाही आहे याची नोंद घ्यावी.)

 27) आपणास सरल बाबत असलेल्या अडचणी ईमेल,व्हाट्सएप्प वर कळवाव्या,त्या सोडवन्यात येईल.अडचणी कळवन्यासाठी ईमेल :
a) Sanchmanyata@gamil.com
b) idreambest@gmail.com  किंवा
c)support.education@maharashtra.gov.in  

*धन्यवाद*
*प्रदीप भोसले*
*हवेली,पुणे*
Mobile no. :9404683229
 (Dont call,only whatsapp message)
Email: idreambest@gmail.com
Blog: havelieducation.blogspot.in
Apps link of my blog's for download : Www.appsgeyser.com/2460364

Tuesday 12 July 2016

⁠⁠⁠सरल महत्वाचे :
दिनांक : 11/07/2016
(कृपया सर्व ग्रुप वर share करा)

1)विद्यार्थी ट्रान्सफर request करत असताना जर ज्या विद्यार्थ्याची request करायची होती त्याची request न करता भलत्याच विद्यार्थ्याची request केली गेली असेल तर सदर request जुन्या शाळेला रिजेक्ट करता येत नाही.तसा अधिकार त्यांना देण्यात आलेला नाही.तो अधिकार गटशिक्षणाधिकारी यांना देण्यात आलेला आहे.परंतु त्यासाठी अशी चुकीची request आली की अशा शाळेने 7 दिवस  त्या request ला कोणताही प्रतिसाद द्यायचा नाही आहे.7 दिवसानंतर अशी request ही मुख्याध्यापकांच्या लॉगिन मधून गटशिक्षणाधिकारी यांच्या लॉगिन ला आपोआप ट्रान्सफर केली जाती.गटशिक्षिक्षणाधिकारी सदर request ची शहानिशा करून रिजेक्ट किंवा ट्रान्सफर करू शकतात.परंतु एखाद्या शाळेने जर चुकून अशा चुकीच्या मुलाची आलेल्या request ला कन्फर्म केले असेल तर मात्र सदर विद्यार्थी हा सदर शाळेला ट्रान्सफर होतो.खर तर ही दोन्ही शाळेची चूक आहे.परंतु गडबडीमध्ये असे होऊ शकते.अशा वेळी सदर विद्यार्थ्याची माहिती पुन्हा त्याच्या मूळ शाळेत परत पाठवणे क्रमप्राप्त आहे हे लक्षात घ्यावे.परंतु या स्टेज ला सदर विद्यार्थी त्या शाळेला रिजेक्ट करता येत नाही.यासाठी ज्या शाळेत सदर विद्यार्थी ट्रान्सफर झाला आहे त्या शाळेने तात्पुरत्या स्वरूपात तो विद्यार्थी डमी माहिती भरून update करावा जेणेकरून ऑनलाइन माहिती मध्ये तो विद्यार्थी आता नवीन शाळेचा विद्यार्थी आहे असे दिसून येईल आणि आता मूळ शाळेला पुन्हा ज्या शाळेने सदर विद्यार्थी update केलेला आहे त्या शाळेला नव्यानंए request पाठवा आणि सदर विद्यार्थी नेहमीच्या प्रोसेस ने आपल्या मूळ शाळेत add करून घ्या.अशा वेळी दोन्ही मुख्याध्यापकाने एकमेकांना सहकार्य करणे अपेक्षित आहे आणि त्यांनी ते वेळेत करावे ही विनंती.अशा केस मध्ये कोणत्याही मुख्याध्यापकांच्या हलगर्जीपणामुळे जर विद्यार्थ्यांच्या अपूर्ण आणि चुकीच्या ऑनलाइन माहितीमुळे जर काही समस्याच निर्माण झाली तर दोन्ही मुख्याध्यापाकास जबाबदार धरले जाणार आहे याची नोंद घ्यावी.

यासाठी विद्यार्थी request करताना खालील प्रकारे काळजी घ्यावी
➡विद्यार्थी request करत असताना नवीन शाळेने ट्रान्सफर बटन क्लीक करण्यापूर्वी आपण योग्य विद्यार्थयालाच सलेक्ट केले आहे का ते पहावे.

➡आपणास एखाद्या शाळेची विद्यार्थी ट्रान्सफर request आलेली असेल त्या request ला कन्फर्म करण्यापूर्वी सदर विद्यार्थी आपल्या शाळेतून खरोखर ट्रान्सफर झाला आहे का,ज्या शाळेत ट्रान्सफर झाला आहे त्याच शाळेची request आलेली आहे का ही दाखला मागणी file मध्ये चेक करून मगच सदर विद्यार्थी ट्रान्सफर request कन्फर्म करावी.अन्यथा अशा चुकीच्या request ला काहीच प्रतिसाद देऊ नये.

2) जर आपल्या शाळेत आलेली request मुख्याध्याकाने वेळेत म्हणजेच 7 दिवसात कन्फर्म केली नाही तर ती request कन्फर्म करण्यासाठी beo यांच्या लॉगिन ला जाते.त्यामुळे कामात हलगर्जीपणा अथवा ही बाब वेळेत माहिती न झाल्यामुळे या सर्व request ह्या beo यांच्या लॉगिन ला गेल्या आहेत.अशा request ची संख्या beo यांच्या लॉगिन ला हजारामध्ये आहेत.त्यामुळे मुख्याध्यापकांनी करावयाचे काम हे गटशिक्षणाधिकारी यांनीया करावे लागत आहे.हे करत असताना गटशिक्षणाधिकारी यांना जसे मुख्याध्यापकाला त्या मुलाबद्दल माहिती असते तशी त्या मुलाबद्दल माहिती नसते.म्हणून त्या मुख्याध्यापकाला बोलावूनच सदर काम करावे लागत आहे.म्हणून आता असे होऊ नये म्हणून गटशिक्षणाधिकारी यांच्या लॉगिन ला या सर्व request ह्या return करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.अशा हालजारोने आलेल्या request गटशिक्षणाधिकारी यांनी पुन्हा त्या शाळेला कन्फर्म करण्याकरिता परत करावयाच्या आहेत याची नोंद घ्यावी.ज्या शाळेने request पाठवलेली आहे त्या शाळेने ऑन 7 दिवस विद्यार्थी request कन्फर्म होण्यायसाठी वाट पहावी.ज्या request चुकीच्या असल्याने गटशिक्षणाधिकारी यांच्या लॉगिन ला आलेल्या आहेत त्या मात्र शहानिशा करून गटशिक्षणाधिकारी यांनी रिजेक्ट करायच्या आहेतच. गटशिक्षणाधिकारी यांनी request रिटर्न केल्यावर या request कन्फर्म करण्यासाठी जुन्या मुख्याध्यापकाकडे पुन्हा 7 दिवसाचा कालावधी असेल.या 7 दिवसात जर त्या मुख्याध्यापकाने या request कन्फर्म केल्या नाही आणि दुसऱयांदा पुन्हा अशा request गटशिक्षणाधिकारी यांना गेल्या तर मात्र अशा मुख्याध्यापकावर कारवाई केली जाणार आहे याची नोंद घ्यावी.त्यामुळे या सूचनेचा गाम्भिर्याने विचार व्हावा ही आपल्या बांधवांना नम्र विनंती..यासनादर्भात अधिक माहितीसाठी आमच्या havelieducation.blogspot.in या ब्लॉग ला भेट द्या.

3) काही पालक असे म्हणत असतात की आमच्या मुलाची प्रगती आम्हाला कमी वाटते तेंव्हा आमच्या मुलास या वर्षी नापास करा आणि याच वर्गात बसवा.अशा वेळी हे लक्षात घ्या की rte नुसार आपणास कोणत्याही विद्यार्थ्यास नापास करता येणार नाही.ऑनलाइन सिस्टिम मध्ये देखील तो विद्यार्थी  तुम्हाला मागील वर्गात दाखवता येणार नाही हे लक्षात घ्यावे.अशा वेळी पालकांना समजावे की या वर्षी त्याची आम्ही प्रगती विशेष लक्ष घालून करून घेऊ अशा वेगवेगळ्या पद्धतीने पालकांचे मतपरिवर्तन करावे ही विनंती.

4) मागील वर्षी भरलेल्या विद्यार्थी माहिती मध्ये काही चुका झाल्या असतील तर त्या दूरस्थ करण्यासाठी आपणास येत्या काही दिवसात सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे याची नोंद घ्यावी.तोपर्यंत ट्रान्सफर आणि update चे काम पूर्ण करून घ्यावे ही विनंती.

5)मागील वर्षी माहिती भरलेल्या विध्यार्थी पैकी काही विद्यार्थी मयत झाले असतील अशा मुलांचे नाव सिस्टिम मधून कमी करण्यासाठी लवकरच सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.याची नोंद घ्यावी.

6)इयत्ता 9  च्या पुढील काही मुले शाळा सोडून गेलेली आहेत, काही मुले दाखला घेऊन गेली आहेत तसेच काही मुले परराज्यात शिकण्यासाठी गेलेली आहेत अशा मुलांचे नावे सिस्टिम मधून कशी कमी करावी याबाबत आपणास लवकरच मार्गदर्शन करण्यात येईल.तोपर्यंत आपण घाई न करता  इतर कामे पूर्ण करून घ्यावेत.

7)विद्यार्थी ट्रान्सफर करताना दुसरया माध्यमातून आला असेल तर update करताना माध्यम बदल करता येते याची नोंद घ्यावी.

8)beo यांच्या लॉगिन मध्ये विद्यार्थी ट्रान्सफर करताना ट्रान्सफर झाला आहे या अर्थाची सूचना येते परंतु प्रत्यक्ष विद्यार्थी मात्र ट्रान्सफर होत नाही अशा तक्रारी येत आहे.त्यांनी हे लक्षात घ्यावे की विद्यार्थी ट्रान्सफर केल्यावर सूचना येते त्यानंतर ok बटन क्लीक।करावे आणि  सदर पेज रिफ्रेश करावे त्यानंतर ते नाव आपणास यादी मध्ये दिसणार नाही.

9) ज्या शाळेत नवीन वर्ग अथवा तुकडी निर्माण झालेली आहे अशा शाळांना तो नवीन वर्ग आणि तुकडी add करण्याची सुविधा master या ऑप्शन मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे याची नोंद घ्यावी.यासंदर्भात अधिक माहिती आमच्या havelieducation.Blogspot.in  ब्लॉग ला भेट द्या.

10)मागील शैक्षणिक वर्षांमध्ये भरलेली 1 ते 8 वी च्या विद्यार्थ्याची  माहिती सिस्टिम द्वारे ऑटो अपडेट केलेली आहे.म्हणजेच आता मागील वर्षी माहिती भरलेला विद्यार्थी आपणास जर 1 ली ला असेल तर तो आता 2 री ला दिसून येणार आहे.याचाच अर्थ असा की स्टुडंट ट्रान्सफर करताना आतापर्यंत आपण एखाद्या विद्यार्थ्याला मागच्या वर्षीच्या वर्गात ट्रान्सफर request करण्यासाठी  शोधत होतो ते आता मागच्या वर्गात न शोधता चालू वर्षीच्या वर्गात शोधावे लागणार आहे याची नोंद घ्यावी.परंतु इयत्ता 9 वीच्या पुढील मुलांचे प्रमोशन हे मॅन्युअली करावे लागणार आहे.अशा शाळेत विद्यार्थी ट्रान्सफर request करताना पुढील शाळेने प्रमोशन केले असेल तर चालू वर्गात त्या विद्यार्थ्याला शोधावे अन्यथा मागेल वर्षीच्या इयत्तेमध्ये त्या मुलाला शोधावे लागेल ही बाब लक्षात ठेवावी.

11)सिस्टिम द्वारे ऑटो अपडेशन करताना फक्त 1 ते 8 वीच्याच मुलांचे पुढील वर्गात अपडेशन होईल,मात्र 9 ते 11 वीच्या मुलांचे updation हे मॅन्युअली करावे लागेल हे सर्व मुख्याध्यापकांनी लक्षात घ्यावे.

12) Duplicate students च्या बाबतीत : विद्यार्थी ट्रान्सफर करण्यापूर्वी मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेतल्या डुप्लिकेट म्हणजेच एकाच विद्यार्थ्याची 2 व 2 पेक्षा अधिक वेळा त्या शाळेत नोंद झाली असेल तर अशा विद्यार्थ्यांच्या अधिकच्या नोंदी सिस्टिम मधून delete करायचे आहे.आपण जर या डुप्लिकेट नोंदी delete केल्या नाही तर beo आणि Eo लेवल वरून सदर नोंदी delete केल्या जातीलच परंतु आपण या नोंदी delete का केल्या नाही यासाठी आपणास जबाबदार धरण्यात येईल याची नोंद घ्यावी.कारण या वर्षी होणाऱ्या संच मान्यतेसाठी ही बाब अतिशय महत्वपूर्ण समजली जाणार आहे.तसेच आपल्या शाळेत एखादा विद्यार्थी डुप्लिकेट असेल आणि आपण त्या विद्यार्थ्याच्या अधिक च्या नोंदीला delete केले नसेल तर अशा विद्यार्थ्यास आपणास ट्रान्सफर करता येणार नाही.अशा विद्यार्थ्याची नोंद वरिष्ठ लेवल ला आपोआप सिस्टिम द्वारे कळवली जाईल याची नोंद घ्यावी आणि त्वरित आपल्या शाळेतील डुप्लिकेट स्टूडंट सिस्टिम मधून delete करण्यात यावे.

13) ऑटो प्रमोशन करताना जर एखाद्या शाळेत 1 ते 4 वर्ग असतील अशा शाळेत इयत्ता 4 थी च्या अद्याप इतर शाळेत ट्रान्सफर न झालेले विद्यार्थी सिस्टिम द्वारे त्याच शाळेत निर्माण केलेल्या आभासी 5 वीच्या वर्गात ट्रान्सफर होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात ठेवले जाणार आहे.सदर चे विद्यार्थी आपल्या शाळेच्या एकूण पटसंख्येत धरले जाणार नाही याची नोंद घ्यावी.जेंव्हा या आभासी वर्गातील विद्यार्थ्याची ट्रान्सफर करण्याची request येईल तेंव्हा आपण या विद्यार्थ्यास ट्रान्सफर करू शकाल.अशाच प्रकारे या पद्धतीने पुढील वर्ग नसणाऱ्या शाळांच्या बाबतीत पुढील आभासी  वर्ग सिस्टिम द्वारे  निर्माण करून पुढील इयत्ता नसलेले विद्यार्थी हे अशा वर्गात तात्पुरते ठेवले जाणार आहे.

14) मॅन्युअली प्रमोशन करताना विद्यार्थी अनुत्तीर्ण अथवा absent असूनही जर चुकून पुढील वर्गात प्रमोट झाला तर तर अशा चुकलेल्या प्रमोशन ला आपणास पुन्हा परत (undo) करता येणार येते.

15)तसेच आपल्या शाळेतील 10 वी चे विद्यार्थी 11 वीला न जाता डिप्लोमा अथवा इतर व्यावसाईक शिक्षणास गेले असतील अशा विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन नोंदी बाबत देखील काय करायचे हे देखील आपणास लवकरच कळवले जाईल.

16) सरल बाबत अधीक माहिती जाणून घेण्यासाठी व वेळोवेळी अपडेट मिळण्यासाठी राज्यस्तरीय व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामिल व्हा.त्यासाठी havelieducation.blogspot.in या ब्लॉग वर जा आणि तेथे राज्यस्तरीय whatsapp समूहात add होण्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या गूगल फॉर्म मध्ये आपली माहिती भरा.आपणास लवकरच add केले जाईल.

MDM पोर्टल :
(मध्यान्ह भोजन योजना)

17) ज्या शाळांनी  सन 2016-17 मधे वर्ग 5 वा किंवा वर्ग 8 वा सूरू केलेला आहे अशा शाळांची मध्यान्ह भोजन योजनाअंतर्गत  daily attendance ची माहिती भरवायाची असल्याने block mdm login मधे जावून opening balance menu मधे  शाळा माहिती view केल्यानंतर खालच्या बाजूला वर्गाच्या समोर टिक मार्क करावे आणि नविन वर्ग add करुन घ्यावा व माहिती approve करावे . त्यानंतर अशा शाळाना वर्ग 5 किवा वर्ग 8 ची daily attendance माहिती भरण्यासाठी उपलब्ध झालेला दिसेल.

18) MDM मध्ये प्राप्त तांदूळ व धान्यादी माल नोंद करण्याची  सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.त्यासाठी mdm पोर्टल लॉगिन करावे आणि  Stock Inword या tab ला click करावे

➡Date of Recived -- माल प्राप्त झाल्याची तारीख टाकावी.येथे मागील तारीख देखील भरता येते.एक लक्षात घ्यावे की या ठिकाणी शाळा सुरु झाल्यानंतर आलेला माल नोंदवायचा आहे.त्या आधीचा नाही.
➡Stock Provider - येथे धान्य व धण्यादी माल पुरावणार्याचे नाव दिलेल्या लिस्ट मधून सिलेक्ट करावे.यामध्ये FCI,MDM provider,इतर शाळा 1 ते 5  व इतर शाळा 6 ते 8 प्रकार ,आपलीच शाळा 1 ते 5 व आपलीच शाळा 6 ते 8 ,इतर,पब्लिक म्हणजेच लोकसहभाग,ओपन मार्केट असे पर्याय उपलब्ध आहेत. जर शाळेस लोक सहभागातुंन माल प्राप्त झाला असल्यास पब्लिक सलेक्ट करावेत, जर शाळेने शेजारच्या शाळेकडून माल उसनवार घेतला असल्यास other school category नुसार select करावे व खालील रकन्यात त्या शालेचा U-dise Code नमूद करावा, शाळेने खुल्या बाजारातून माल खरीदी केला असेल तर ओपन मार्केट सिलेक्ट करावे आणि खाली दुकानदाराचे नाव भरावे.लोकसहभागातून मिळालेल्या धान्याच्या बाबतीत publc सिलेक्ट करावे आणि खाली ज्यांनी धान्य दिले त्यांचे नाव लिहावे.MDM PROVIDER सिलेक्ट केल्यावर पावतीवरील पुरवठादाराचे नाव टाकावे.अशा प्रकारे माहिती save करावी  यानंतर आपला स्टॉक ऑटोमॅटिक मेन्टेन होईल.

19)सरल संदर्भात कोणत्याही अडचणी आल्यास आमच्या havelieducation.blogspot.in या ब्लॉग ला भेट द्या.त्या ठिकाणी आपल्या सर्व अडचणी दूर करण्यात येईल.तेथे दिलेल्या विविध online google फॉर्म च्या मदतीने आपण आम्हाला आपल्या येणाऱ्या समस्या लेखी स्वरूपात सांगू शकाल.तसेच आपण ९४०४६८३२२९ या whatsapp क्रमांकावर देखील message पाठवू शकता (call करू नये ).

20)✏राज्यस्तरीय whatsapp ग्रुप मध्ये add होण्यासाठी महत्वाचे :

आम्ही सरल संदर्भातील अडचणी सोडवण्यासाठी राज्यस्तरीय whatsapp चे   ग्रुप तयार केलेले आहेत.या ग्रुप मध्ये फक्त कोणत्याही शैक्षणिक ग्रुपचे admin अथवा सरल चे cluster अथवा तालुका स्तरावर काम करणारे मार्गदर्शक सहभागी होऊ शकतात. यासाठी http://havelieducation.blogspot.in
या ब्लॉग वर व्हाट्सएप्प समुहात सामिल होण्यासाठी एक फॉर्म देण्यात आलेला आहे त्या फॉर्म मध्ये मध्ये विचारलेली आपली माहिती आणि व्हाट्सएप्प मोबाइल क्रमांक  भरून आम्हाला ऑनलाइन पाठवा.आपणास यथावकाश ग्रुप मध्ये add करुन घेतले जाईल व वेळोवेळी आपणास सरल बाबत माहिती पाठवली जाईल.
(सुचना : या ग्रुपवर सरल व्यतिरीक्त कोणतीही माहिती दिली जाणार नाही अथवा या ग्रुप वर सरल व्यतिरिक्त कोणतीही post टाकण्यास परवानगी नाही आहे याची नोंद घ्यावी.)

 21) आपणास सरल बाबत असलेल्या अडचणी ईमेल,व्हाट्सएप्प वर कळवाव्या,त्या सोडवन्यात येईल.अडचणी कळवन्यासाठी ईमेल :
a) Sanchmanyata@gamil.com
b) idreambest@gmail.com  किंवा
c)support.education@maharashtra.gov.in  

धन्यवाद
प्रदीप भोसले
हवेली,पुणे
Mobile no. :9404683229
 (Dont call,only whatsapp message)
Email: idreambest@gmail.com
Blog: havelieducation.blogspot.in
Apps link of my blog's for download : Www.appsgeyser.com/2460364