Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu
जि.प.केंद्रीय उच्च प्राथमिक मराठी कन्या शाळा विडूळ तर्फे आपले ब्लॉगवर हार्दिक स्वागत! ब्लॉगचे काम चालू आहे भेटीबद्दल धन्यवाद !

Saturday 1 April 2017

*सरल महत्वाचे* :
*सूचना क्रमांक* : *१०२२*
*दिनांक* : *०१/०४/२०१७*
*(महत्वाची सूचना आहे,सर्वांना share करावी ही विनंती )*
*प्रदीप भोसले,हवेली,पुणे*

(सदर पोस्ट ही *मा.डॉ.सुनिल मगर साहेब,अध्यक्ष,ई-गव्हर्नन्स,महाराष्ट्र राज्य तथा संचालक,बालभारती* यांच्या सूचनेनुसार व निरीक्षणात पाठवलेली आहे)
__________________________________________

 *Duplicate विद्यार्थी सिस्टिम मधून काढण्यासाठीची नविण सुविधा उपलब्ध करून दिल्याबाबतची सूचना*  __________________________________________

✏आपल्या शाळेत डुप्लिकेट विद्यार्थी आहे किंवा नाही,असल्यास त्या डुप्लिकेट विद्यार्थ्याच्या बाबतीत नवीन पद्धतीने प्रोसेस कशी करावी हे जाणून घेण्यासाठी आमच्या
 pradeepbhosale.blogspot.in
या ब्लॉग वेबसाईट ला भेट द्या.या ब्लॉग वेबसाईट मधील Student portal या टॅब मधील Duplicate या Tab ला क्लीक करा व संपूर्ण माहिती जाणून घ्या.

                            *किंवा*

✏खालील लिंक ला क्लीक करून मॅन्युअल Download करून सविस्तर माहिती जाणून घ्या.
                            *लिंक*

                  goo.gl/B0CA0L

डुप्लिकेट विद्यार्थी सिस्टिम मधून काढून टाकण्याची नविन प्रोसेस काय आहे हे थोडक्यात पाहू.......

🔸 *डुप्लिकेट विद्यार्थी म्हणजे काय ?*🔸

➡ *एखाद्या शाळेतील विद्यार्थी कोणत्याही कारणात्सव जर त्याच शाळेत अथवा इतर दुसऱ्या कोणत्याही एका अथवा अनेक शाळेत दुबार नोंदवला गेला असेल तर student पोर्टल मध्ये अशा दुबार नोंदवलेल्या गेलेल्या मुलाची एका पेक्षा अधिक नोंद तयार होते.अशा अयोग्य दुबार नोंदीस आपण दुबार म्हणजेच Duplicate विद्यार्थी नोंद असे म्हणतात.म्हणजेच अशा विद्यार्थ्यास Duplicate विद्यार्थी असे संबोधले जाते.* तर अशा अयोग्य नोंदीस आपणास system मधून काढून टाकण्याच्या प्रक्रियेस Duplicate विद्यार्थी system मधून काढून टाकणे असे म्हणावे. असे Duplicate विद्यार्थी आपणास शाळा, गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी, उपसंचालक, संचालक Login मधून काढण्याची सुविधा student पोर्टल मध्ये नव्याने देण्यात आलेली आहे.

🔸 *डुप्लिकेट विद्यार्थी नोंद कशी तयार होते?*🔸

✏ *१) एखादा विद्यार्थी जुन्या शाळेतुन नवीन शाळेत शिक्षणासाठी ट्रान्सफर झालेला असेल परंतु नवीन शाळेने सदर विद्यार्थी online ट्रान्सफर करून न घेता new entry द्वारे नोंद करून घेतला असेल तर अशा विद्यार्थ्याची दुबार नोंद तयार होते.*

✏ *२) एकाच शाळेत एखाद्या विद्यार्थ्याची चुकून दोन वेळा  नोंद झालेली असेल तर अशी नोंद दोन वेळा तयार होते.*
 
 अशा प्रकारे वरील व इतर काही कारणामुळे विद्यार्थी नोंद ही डुप्लिकेट तयार होते.

 ➡  या आधी देखील असे डुप्लिकेट विद्यार्थी सिस्टिम मधून काढून टाकण्याची सुविधा *शाळा व गटशिक्षणाधिकारी* लॉगिन ला देण्यात आलेली होती.त्यामुळे एकाच शाळेत व  तालुक्यात असे डुप्लिकेट विद्यार्थी काढता येत होते.परंतु एक विद्यार्थी जर इतर तालुक्यात, जिल्ह्यात,विभागात दुबार नोंदवला गेलेला असेल तर अशा विद्यार्थ्यास आधीच्या सुविधेद्वारे सिस्टिम मधून काढता येत नव्हते.परंतू आता दिलेल्या *नवीन सुविधेद्वारे इतर तालुक्यातील,जिल्ह्यातील,विभागातील एकाच विद्यार्थ्याची दुबार झालेली नोंद काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.एवढेच नव्हे तर या सुविधेचा पुन्हा एकाच शाळेतील,तालुक्यातील डुप्लिकेट नोंद असलेल्या विद्यार्थ्याची नोंद देखील नव्याने काढून टाकता येणार आहे.*

➡   या आधी डुप्लिकेट विद्यार्थी काढण्याची जी सुविधा देण्यात आलेली होती ती पद्धत बंद करून *नव्या पद्धतीने डुप्लिकेट विद्यार्थी system मधून काढण्याची सुविधा देण्यात आलेली आहे,ही सुविधा कशा पद्धतीने काम करणार आहे हे सर्वांनी समजून घेणे आवश्यक आहे.*

➡  डुप्लिकेट विद्यार्थी नोंद सिस्टिम मधून काढून टाकण्याच्या या सुविधेमध्ये *सर्वप्रथम प्रत्येक विभागाचे उपसंचालक हे त्यांच्या लॉगिन मधून अशा डुप्लिकेट विद्यार्थ्याची यादी जनरेट करणार आहेत.*ही यादी जनरेट करण्याची सुविधा त्यांच्या लॉगिन ला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

➡ ही *यादी जनरेट केल्यावर जे विद्यार्थी ज्या ज्या शाळेत एका पेक्षा अधिक वेळा नोंद झालेले आहे अशा सर्व शाळेत (जुन्या व नवीन शाळेत) Duplicate या Tab ला क्लीक केल्यावर दिसून येतील.*

➡  *त्यामुळे आपल्या शाळेतील कोणताही विद्यार्थी आपल्या शाळेत, तालुक्यात, जिल्ह्यात, विभागात अथवा राज्यात इतर ठिकाणी डुप्लिकेट झालेला आहें का हे प्रत्येक शाळेने नव्याने तपासून घेणे गरजेचे आहे हे प्रत्येक शाळेने लक्षात घ्यावे.*

➡ जर आपल्या शाळेत शिकत असलेला/नसलेला *एखादा विद्यार्थी डुप्लिकेट या टॅब मध्ये डुप्लिकेट म्हणून दिसत असेल तर अशा विद्यार्थ्यास मार्क करून तो विद्यार्थी आपल्या शाळेत शिकत आहे अथवा नाही ही माहिती भरून वरिष्ठ लॉगिन ला पाठवावी.*ही प्रोसेस कशी करावी हे समजून घेण्यासाठी या पोस्ट मध्ये शेवटी दिलेल्या लिंक ला क्लीक करून सदर प्रोसेस जाणून घ्यावी.

➡ जर *आपल्या शाळेत शिकत असलेला एखादा विद्यार्थी  डुप्लिकेट झालेला दिसून येत असेल तर आपण तशी माहिती online पद्धतीने वरिष्ठ लॉगिन ला कळवावी.जर आपला विद्यार्थी आपल्याच शाळेत अथवा तालुक्यातील इतर शाळेत शिकत असेल तर त्या विद्यार्थाची नोंद आपल्याच शाळेत ठेवण्यासाठीची आपली request आपल्याच तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी यांना जाईल.*तेंव्हा आपण अशा वेळी संबंधित विद्यार्थ्याच्या बाबतीतील पुरावे घेऊन आपल्या गटशिक्षणाधिकारी यांच्याशी संपर्क साधावा व आपली request त्यांच्याकडून approve करून घ्यावी.

✏ वरील प्रमाणे जर *आपला विद्यार्थी आपल्याच जिल्ह्यातील इतर तालुक्यात असलेल्या शाळेत  डुप्लिकेट झाला आहे असे दिसून आल्यास आपली request ही आपल्या जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी यांच्या लॉगिन ला जाईल.*तेंव्हा आपण अशा वेळी संबंधित विद्यार्थ्याच्या बाबतीतील पुरावे घेऊन आपल्या शिक्षणाधिकारी यांच्याशी संपर्क साधावा व आपली request त्यांच्याकडून approve करून घ्यावी.

✏ तसेच *जर आपला विद्यार्थी आपल्याच विभागातील इतर जिल्ह्यातील कोणत्याही शाळेत  डुप्लिकेट झाला आहे असे दिसून आल्यास आपली request ही आपल्या विभागातील उपसंचालक यांच्या लॉगिन ला जाईल.*तेंव्हा आपण अशा वेळी संबंधित विद्यार्थ्याच्या बाबतीतील पुरावे घेऊन आपल्या विभागाच्या उपसंचालक यांच्याशी संपर्क साधावा व आपली request त्यांच्याकडून approve करून घ्यावी.

✏ आपल्या शाळेतील विद्यार्थी आपल्या शाळेव्यतिरिक्त इतर कोणत्या शाळेत नोंदवला गेला आहे हे समजून घेण्यासाठी *या पोस्ट च्या खाली दिलेल्या लिंक ला क्लीक करून दिलेल्या मॅन्युअल वाचून सविस्तर माहिती जाणून घ्या.*

✏ जर आपल्या शाळेतील एखादा विद्यार्थी इतर शाळेत शिकायला गेलेला असेल परंतु नवीन शाळेने त्या विद्यार्थ्यास ट्रान्सफर करून न घेता new entry द्वारे नवीन विद्यार्थी म्हणून नोंद घेतली असेल तर अशा विद्यार्थ्याच्या बाबतीत जुन्या शाळेने आपल्या शाळेत शिकत नसलेल्या अशा विद्यार्थ्याच्या नावासमोर असलेल्या No या बटनावर क्लीक करावे.अशा वेळी *आपण No या बटनाला ला क्लीक केल्यावर सदर विद्यार्थी ज्या नवीन शाळेत शिकत असेल त्या शाळेला सिस्टिम द्वारे approve केला जाईल.अशा केस मध्ये अशा विद्यार्थ्याच्या बाबतीत नवीन शाळेला सदर विद्यार्थ्यासाठी वरिष्ठ लॉगिन ला संपर्क साधण्याची आवश्यकता असणार नाही याची नोंद घ्यावी.असा विद्यार्थी जुन्या शाळेने No या बटनावर क्लीक केल्यानंतर लगेचच नव्या शाळेस सिस्टिम द्वारे approve केला जाईल.*

➡ जुन्या शाळेने विद्यार्थ्याच्या नावासमोर असलेल्या No टॅब ला क्लीक करण्याआधीच जर नवीन शाळेने अशा विद्यार्थ्याच्या बाबतीत वरिष्ठ लॉगिन ला approve साठी request पाठवलेली असेल आणि वरिष्ठ लॉगिन ने सदर विद्यार्थी तोपर्यंत approve केलेला नसेल तर *जेंव्हा जुनी शाळा त्या विद्यार्थास No म्हणून क्लीक करेल तेंव्हा सदर विद्यार्थ्याची request वरिष्ठ लॉगिन मधून आपोआप निघून जाईल व तो विद्यार्थी नवीन शाळेला सिस्टिम द्वारे approve केला जाईल हे लक्षात घ्यावे.*

➡ तसेच नवीन शाळेने एखाद्या विद्यार्थास approve करण्यासाठी वरिष्ठ लॉगिन ला request पाठवली आणि जर वरिष्ठ लॉगिन ने खात्री करून जर त्या विद्यार्थ्यास approve केले तर सदर विद्यार्थी नोंद नवीन शाळेत ठेवली जाईल व जुन्या शाळेतून ती नोंद सिस्टिम द्वारे परस्पर काढून टाकली जाईल.हे करत असताना *वरिष्ठ लॉगिनने म्हणजेच गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी, उपसंचालक यांनी विद्यार्थ्यास approve/reject करताना योग्य कागदपत्रे तपासून खात्री करून घ्यावी जेणेकरून विद्यार्थी नोंद योग्य शाळेत राहील.*

*अशा प्रकारे प्रत्येक शाळेने आपल्या शाळेतील कोणतेही विद्यार्थी डुप्लिकेट झालेले आहे किंवा नाही हे सर्वप्रथम तपासून घ्यावे यासाठी आपण आपल्या शाळेच्या लॉगिन मधील Maintenance या टॅब मधील Duplicate या Tab ला क्लीक करावे.*

✏ लवकरच student पोर्टल मध्ये *विद्यार्थी माहिती भरण्यासाठीचा सेकंड फेज,सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन (CCE),Online निकाल व गुंपत्रक निर्मिती प्रक्रिया* सुरु होणार आहे.त्यापूर्वी प्रत्येक शाळेने सदर काम त्वरित पूर्ण करावयाचे आहे हे लक्षात घ्यावे.अन्यथा अशा डुप्लिकेट विद्यार्थ्याची माहिती आपणास भरता येणार नाही.याशिवाय पुढील वर्षाच्या संच मान्यतेस अडचण निर्माण होईल ही बाब गाम्भीर्याने लक्षात घ्यावी.तसेच *जोपर्यंत असे डुप्लिकेट विद्यार्थी आपल्या शाळा लॉगिन मधून काढले अथवा घेतले जाणार नाही तोपर्यंत त्या त्या शाळेला वरील काम करण्याची सुविधा दिली जाणार नाही अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत.*

✏ *या कामाचा लोड सिस्टिम वर येऊ नये म्हणून सदर कामाचे विभाग निहाय वेळापत्रक तयार करण्यात आलेले आहे.त्या नुसार त्या त्या विभागातील जिल्ह्याने आपले हे काम वेळेत पूर्ण करणे गरजेचे आहे.या वेळापत्रकानुसार दिनांक १ एप्रिल २०१७ पासून ते ५ एप्रिल २०१७ पर्यंत पुणे विभागासाठी (जिल्हे : पुणे, सोलापूर, अहमदनगर) ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.या मुदतीनंतर पुणे विभाग बंद करून दुसऱ्या विभागाला ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल.*

*तसेच वेळेवेळी सरल संदर्भात नव्याने येणारी माहिती आपणास आपल्या ब्लॉग ईमेल रीडिंग लिस्ट मध्ये हवी असल्यास आमच्या ब्लॉग  च्या उजव्या-खालच्या बाजूला उपलब्ध असलेल्या follow या बटनाला क्लीक करा व आपल्या ईमेल id च्या साहाय्याने follow करा.त्यानंतर सरल संदर्भात असणारी नविन माहिती सविस्तरपणे त्या त्या वेळी आपणास पाठवली जाईल.*

*राज्यस्तरीय whatsapp सरल ग्रुपचे सदस्य व्हायचे असेल तर पुढील लिंक वर क्लीक करा आणि उपलब्ध करून देण्यात आलेला फॉर्म भरा.*

                               *लिंक*

                         goo.gl/j9nFGk

*धन्यवाद*
*प्रदीप भोसले*
*हवेली,पुणे*
Mobile no. :9404683229
(Dont call,only whatsapp message)
Email: egov.saral@gmail.com
Blog: pradeepbhosale.blogspot.in

Friday 24 March 2017

💻MDM - monthly calculator💻

               ↕लिंक ↕

🌐 MDM - monthly (zip file) 🌐

https://drive.google.com/file/d/0B3MR276cSlKPTFR6d2hxZUlYdWc/view?usp=drivesdk



 🍁🍁 मुख्य वैशिष्ट्ये 🍁🍁                

१) महिन्यातून एकदाच माहिती भरावी लागते.

२)mdm मधील नवीन बदलांचा विचार करूनच फॉरमॅट तयार केले आहे.

३) नवीन व संपूर्ण माहिती संकलित करणारे प्रपत्र ब 2 उपलब्ध करून दिले आहे.

४)manual व किरकोळ चुका दुरुस्त करण्यासाठी सोय उपलब्ध

५)चार दशांश स्थळांनुसार गणिती क्रिया होत असल्याने अचूकता जास्त

६) सर्व माहिती प्रिंटसह मिळणार

७) MDM - चे इतरही रेकॉर्ड  झटपट  तयार करण्यासाठी अनेक उपयुक्त गणक उपलब्ध करून दिले आहेत -

MDM - गणक विभागामध्ये

८)mdm च्या सर्व नोंदवह्या दिनांक व वारासहित मिळणार

mdm - प्रिंट विभागामध्ये

९)आपण नोंदी करताना केलेल्या चुका व केलेली दुरुस्ती म्हणजेच धान्यादी वापरावयाचे प्रमाण व प्रत्यक्ष वापरलेले प्रमाण यांचा माहेवार  वार्षिक आढावा मिळवा एकाच प्रिंटमध्ये

दुरुस्ती शोधा या शीट मध्ये

१०)excel file वापरण्यासाठी आवश्यक सूचना आपणास त्या त्या शीटवर उपलब्ध आहेत.

               ✏  अनिल औटी ✏

            📲 7588079003📲

🌷🌷  MDM - Data entry या विभागात महिन्यातून एकदाच आवश्यक माहिती भरा. व त्या माहितीपासून प्रिंटसह मिळवा 🌷🌷

(१)प्रपत्र - ब (माहेवार)
(२)सर्व धान्यादि पदार्थांचा वार्षिक गोषवारा
(३) प्रपत्र - ब - २ (माहेवार)  - नवीन
(४)मानधन - खर्च गोषवारा
(५)धान्यादी प्रमाण गोषवारा
 
🌲🌲 MDM - साठी इतर उपयुक्त सुविधा 🌲🌲

 🐧🐧गणक विभाग🐧🐧

(१) MDM - दैनिक गणक

उपस्थिती टाका व शिजवायचा पदार्थ मिळवा. प्रमाण सहजपणे बदलू शकता.


(२) MDM - मानधन गणक - शेकडा प्रमाणानुसार


शेकडा प्रमाणानुसार प्राप्त इंधन - भाजीपाला मानधनाचे वाटप करा झटपट

(3) MDM - मानधन गणक - पैसेवारी प्रमाणानुसार

पैसेवारी प्रमाणानुसार प्राप्त इंधन - भाजीपाला मानधनाचे वाटप करा झटपट


(४)MDM - स्वयंपाकी मानधन गणक

तांदूळ शिजवलेल्या दिवसांनुसार स्वयंपाकी मानधन मिळवा झटपट


(५) MDM - मागणी गणक

पुढील हव्या तेवढ्या दिवसांची हव्या त्या प्रमाणानुसार धान्यादी मागणी मिळवा झटपट


(६)MDM - भाग -१ गणक (प्रिंटसह)

तांदूळ हिशोबाचे भाग -१ पान तयार करा झटपट


(७)MDM - Menucard Maker


MDM मेनूकार्ड व प्रमाण सारखे बदलते यासाठी MDM - Menucard Maker चा वापर करून 10 सेकंदात मिळवा - मेनूकार्ड, प्रिंटसह


(८) MDM - चव नोंदवही (Auto)


मेनूकार्ड एकदा निश्चित केल्यावर त्यापासून हव्या त्या महिन्याच्या चव नोंदवहीचे पान तयार करा 10 सेकंदात



🐧🐧 प्रिंट विभाग 🐧🐧

१) नोंदवही भाग १ - एक वर्ष

हव्या त्या संपूर्ण वर्षाची नोंदवही; दिनांक व वारासहित - १२ प्रिंट काढा व नोंदवही तयार करा.


२) नोंदवही भाग २ - एक वर्ष

हव्या त्या संपूर्ण वर्षाची नोंदवही; दिनांक व वारासहित - २४ प्रिंट काढा व नोंदवही तयार करा.

३) चव नोंदवही - एक वर्ष


हव्या त्या संपूर्ण वर्षाची नोंदवही; दिनांक व वारासहित - १२ प्रिंट काढा व नोंदवही तयार करा.

४)आकडेपत्रक - ४० दिवस (१ ते ५ व ६ ते ८)

पट व उपस्थिती बदलत नसल्यास एकदाच पट व उपस्थिती टाका व पुढील 40 दिवसांची पट व उपस्थिती मिळवा एका क्लिक मध्ये

५)आकडेपत्रक - format

प्रिंट काढून आकडेपत्रक वही झटपट तयार करा.

६)कच्ची माहिती १ -

calculations साठी आवश्यक कच्ची माहिती संकलित करण्यासाठी

७)कच्ची माहिती २ -

धान्यादी पदार्थांचे संभाव्य दिवस  माहेवार नोंदविण्यासाठी फॉरमॅट

८)इतिवृत्त वही -

इतिवृत्ताचा एक नमुना प्रिंटसाठी उपलब्ध ,नमुन्यात बदलही करू शकता.

               ↕लिंक ↕

🌐 MDM - monthly (zip file) 🌐

https://drive.google.com/file/d/0B3MR276cSlKPTFR6d2hxZUlYdWc/view?usp=drivesdk



               ↕लिंक ↕

🌐 🌐🌐🌐🌐MDM - monthly (Unzip file) 🌐🌐🌐🌐

https://drive.google.com/file/d/0B3MR276cSlKPcWNPUjUwcEJkeTA/view?usp=drivesdk


               🌷  धन्यवाद 🌷

                 ☂आपलाच ☂

               ✏  अनिल औटी ✏

            📲 7588079003📲

⛳⛳⛳वापरून पहा व मगच share करा.⛳⛳⛳

                 🌷 धन्यवाद🌷

Saturday 18 March 2017

दि.27/02/2017 च्या शिक्षक जिल्हान्तर्गत बदली GR मधील प्रमुख तरतुदी...............

आधी GR वाचा.

1)सेवा ज्येष्ठता यादीत आपल्या खालीअसणाऱ्या शिक्षकांच्या शाळा आपण पसंतीच्या 20
 शाळा म्हणून टाकू शकतो.
व या वर्षी 100% विनंती बदली करु शकतो.
जिल्ह्यात कोठेही..

2) आपल्या शाळेवरील आपली जागा जर आपल्या पेक्षा ज्येष्ठ शिक्षकाने घेतल्यास आपली प्रशासकीय बदली होईल.

3)प्रशासकीय बदली ती ही पसंतीच्या 20 शाळा देऊनच

4)सेवा ज्येष्ठता यादीत आपल्या खालीअसणाऱ्या शिक्षकांच्या शाळा आपण पसंतीच्या 20
 शाळा म्हणून टाकू शकतो.

5)टप्पा क्र1,2, 3 व 4  या मध्ये बदली होणाऱ्या विशेष शिक्षकांना त्यांच्या पेक्षा जेष्ठ शिक्षकांच्या जागाही बदली ने घेता येऊ शकतात.

6) बदल्यांसाठीच्या टक्केवारी चे कोणतेही बंधन नाही.
बदलीपात्र शिक्षकांच्या कितीही बदल्या होऊ शकतात.अगदी हजारातही.

7)सामान्य बदलीपात्र शिक्षकाला टप्पा क्र 5 मध्ये बदली साठी त्याच्या पेक्षा कमी सेवाजेष्ठता असलेल्या शिक्षकांच्या शाळेचाच पसंतिक्रम द्यावा लागेल.

8)सेवाजेष्ठता यादीप्रमाणे बदलीसाठी आपला नंबर येईपर्यन्त जर आपली शाळा कोणीही बदलीसाठी मागितली नाही. तर आपण बदली साठी नकार देऊ शकतो.
मात्र आपल्यापेक्षा सेवाजेष्ठ शिक्षकांनी आपल्या शाळेवरील आपली जागा घेतल्यास आपली प्रशासकीय कारणास्तव बदली होणारच/ करावी लागणार.
9) विनंती बदली व प्रशासकीय बदली यांचा सुंदर मिलाप साधलेला 27 फेब्रुवारी 2017 चा शासन निर्णय भविष्यात कायम राहिल्यास
आपल्या मनपसंत शाळेची निवड करणे व याच वर्षी मे महिन्यात बदली करुण घेणे फायद्याचे ठरेल.
पुढील 10 वर्षात पसंतीनुसार शाळा निवडण्याचे पर्याय कमी असतील.
10)बदली अधिकार प्राप्त शिक्षक हा बदली पात्र असेलच असे नाही म्हणून त्याने विवरण पत्र भरून देणे बंधनकारक आहे .अन्यथा अधिकार प्राप्त असूनही बदली होणार नाही.

11) सर्व बदली अधिकार प्राप्त व बदली पात्र शिक्षकांच्या जागा  बदली हवी असलेल्या शिक्षकांसाठी खुल्या आहेत.मेमो चालू असताना
नकार देणाऱ्या शिक्षकांच्या जागा मात्र त्यापुढील शिक्षकांना घेता येणार नाही.

12) बदली अधिकार प्राप्त शिक्षकांना  फक्त सोप्या क्षेत्रातीलच जागेवर बदली मागता येईल.त्यांना अवघड क्षेत्रातुन पुन्हा अवघड क्षेत्रात बदली दिली जाणार नाही.


आता विवरण पत्राविषयी........

1)विवरण पत्र क्र1------ मधील चौकटीत ✔खूण केल्यास तुमची विनंती बदली होणार नाही.परंतु तुमच्या पेक्षा सेवाजेष्ठ शिक्षकांनी तुमच्या शाळेवरील तुमची जागा घेतल्यास तुमची प्रशासकीय बदली होईल.त्यासाठी मेमो ला हजर रहावे लागेल.

2)विवरण पत्र क्र 2-----अवघड क्षेत्रातील बदली अधिकार प्राप्त शिक्षकाला बदली नको असल्यास त्यांनी हे विवरण पत्र भरून देऊ नये. भरून दिल्यास तुम्हाला टप्पा क्र 4 मध्ये प्राधान्याने फक्त सोप्या क्षेत्रातीलच शाळा विनंतीने घेता येईल.पुन्हा अवघड क्षेत्रातील शाळा मिळणार नाही.बदली अधिकार प्राप्त आहे व बदली पात्र ही आहे त्यांनी विवरण पत्र 1 ही भरून द्यावे लागेल.तसेच जर आपण बदली अधिकार प्राप्त नसताल व बदली पात्र असताल तरीही विवरण पत्र 1 भरून देणे बंधनकारक आहे.


3) विवरण पत्र क्र3------ विशेष संवर्ग शिक्षक भाग 1 मधील शिक्षकांना बदली नको असल्यास त्यांनी चौकटीत✔खूण करावी.खूण केल्यास मेमोला हजर राहण्याची गरज नाही.

4) विवरण पत्र क्र4---पतिपत्नी पैकी जो बदली पात्र असेल व त्या दोघांचे सध्या च्या शाळेचे अंतर 30 km पेक्षा जास्त असेल तरच हे विवरण पत्र भरता येईल.
दोघेही बदली पात्र किंवा बदली अधिकार प्राप्त नसल्यास बदली होणार नाही.






 विवरण पत्रे
क्र1--- बदली पात्र शिक्षकांनी व बदली अधिकार प्राप्त शिक्षकांनी भरून देणे बंधनकारक.

क्र 2--- बदली अधिकार प्राप्त शिक्षकांनी भरून द्यावीत.
बदली अधिकार प्राप्त शिक्षक बदली पात्र नसतील व त्यांना बदली करायची नसल्यास त्यांनी भरून देऊ नये.

क्र 3---- विशेष संवर्ग शिक्षक भाग 1 यांनी भरून द्यावीत.

क्र 4 -- पतिपत्नी यांनी त्यांच्या शाळेतील सध्याचे अंतर 30 km पेक्षा जास्त आहे त्यांनीच भरून द्यावीत.

13)------व्याख्या क्र 4 व विवरण पत्र क्र 1 याचा मेळ बसत नाही.
विवरण पत्र क्र 2 मध्ये असलेला शाळांची यादी लिहायचा तक्ता  विवरण पत्र क्र 1 मध्ये दिला नाही.
म्हणजे  जिल्ह्यात हजर दिनांकनुसार 10 वर्ष पूर्ण झाल्यास  सोप्या क्षेत्रातील शिक्षकबदली पात्र होईल.
शाळा अवघड क्षेत्रात असेल तर 3 वर्ष सलग सेवा
सोपे 10 वर्ष
म्हणजे जिल्हा हजर दिनांक 31 मे 2007 पुर्विचा पाहिजे

14)  प्रशासकीय बदली म्हणजे विनंती बदली अनिवार्य ,तुम्ही नकार देऊ शकत नाही.
तेव्हा अर्जात सेवा ज्येष्ठता यादीत आपल्या खाली असणाऱ्या बदली पात्र शिक्षकांच्या शाळा टाका.किंवा तुमचा नंबर च्या क्षणी खुल्या असणाऱ्या शाळा घ्या.
पेसात होणारी प्रशासकीय बदली मात्र आपली पसंती विचारात घेतली जात नाही.
15) अवघड व् सोपे क्षेत्र यादी CEO साहेब या महिन्यात घोषित करणार आहेत.म्हणजे आज पर्यंत पेसा भाग सोडला तर सर्व जिल्हा क्षेत्र हे सोपेच होते.त्यामुळे विवरण 2 मध्ये दिलेला मागील शाळेचा तक्ता विवरण 1 मध्ये दिला नाही.
             त्यामुळे जिल्हा हजर दिनांकनुसार 10 वर्ष पूर्ण झाली असल्यास आपण बदली पात्र आहात.
        मात्र एखाद्याने त्यातील 8 वर्ष पेसात गेली व 2 वर्षापुर्वी तो पेसातून बाहेर आला असेल, व् त्याचे नाव बदली पात्र यादीत आले असल्यास बदली पात्र यादी घोषित झाल्यावर त्या शिक्षकाने आक्षेप घ्यावा.100% त्याचे नाव वगळले जाईल

16) प्रमोशन घेतले असले तरी ही जिल्हा हजर दिनांक धरणार आहेत
17)विनंती बदली करणे बंधनकारक नाही.त्यामुळे अवघड क्षेत्रात एखादा शिक्षक अधिकार प्राप्त नाही परंतु बदली पात्र आहे अशा शिक्षकांची नावे बदली पात्र यादीत येतील की नाही हे सांगता येत नाही तसेच  बदली होईल की नाही हे सांगता येत नाही.

18)टप्पा क्र 1 साठी उदाहरण:---- जिल्ह्यात पेसा भरल्यानंतर 200 जागा रिक्त असल्यास त्या कोठे कोठे ठेवायच्या याचा अधिकार प्रशासनाचा आहे.
              मला असे वाटते 20 पेक्षा कमी पट असणाऱ्या शाळेवर बदली पात्र शिक्षक असल्यास त्या जागा प्रशासन सक्तीने ठेवावयाच्या रिक्त जागा म्हणून घोषित करु शकते.
19)टप्पा क्र 4 मधील वाक्य क्र 5 नुसार त्यांची बदली फक्त सोप्या क्षेत्रात होऊ शकते.
अवघड मधून अवघड त केल्यावर पुन्हा ते पुढच्या वर्षी बदली मागु शकतात म्हणून वाक्य क्र 5 घातले आहे.

उदाहरण-----
समजा नगर जिल्ह्यात कार्यरत शिक्षक 10000 आहेत व बदली अधिकार प्राप्त व बदली पात्र 7000 आहेत . तर सेवा ज्येष्ठता यादीतील अनुक्रमांकनुसार उपलब्ध असणाऱ्या पसंती साठी जागा खालीलप्रमाणे-------------
अ क्र               उपलब्ध जागा
1                     7000
2                     6999
3                     6998
1000               6000
2000               5000
3000               4000
5000               2000
6998                 3
6999                 2
7000                 1



20)व्याख्या || मधील 2 नुसार एकही बदली न करता पेसातील रिक्त जागा निरंक करून उर्वरित जिल्ह्यातील ठेवावयाच्या रिक्त जागा निश्चित केल्या जातील. व नंतर बदली प्रक्रियेला सुरुवात होईल.
21) पेसा भाग असलेला अवघड क्षेत्रातील जागा विनंतीने न भरल्यास सोप्या क्षेत्रातील जुनिअर्स वर अन्याय होऊ शकतो.त्यांना तेथे जावे लागेल.


22)व्याख्या || मधील 2 नुसार .......
एकही सेवाजेष्ठ शिक्षक त्यांच्या सेवानिवृत्ति पर्यंत पेसा भाग असलेल्या अवघड क्षेत्रात जाऊ शकत नाही.
विनंतीने त्या जागा न भरल्यास जाऊ शकतो तो फक्त सोप्या क्षेत्रातील जूनियर.
             पूर्वीच्या GR ने मागील 6 -7 वर्षात पेसा 100 % भरणेसाठी व जिल्ह्याचे समाणीकरण करणे साठी अनेक सेवाजेष्ठ शिक्षकांच्या कुटुंबाची घडी विसकटुन त्यांच्या कुटुंबाची वाताहत झाली.
         आता नवीन GR मधील व्याख्या || मधील 2 नुसार एकही बदली न करता पेसातील रिक्त जागा निरंक करून उर्वरित जिल्ह्याचे समाणीकरणही होणार आहे.
23)ठेवावयाची  रिक्त जागा सध्या रिक्त नसल्यास तेथील शिक्षकाची बदली टप्पा क्र 1मध्ये होईल.

राजेंद्र भागवत,
हनुमंत येवले,
कर्जत(अहमदनगर)
9960275202

Friday 10 March 2017

डिजिटल पटनोंदनी सर्वे एक्सेल फाईल
📊📊📊📊📊📊📊📊📊
👉🏽Register मध्ये सर्वे डेटा भरल्यानंतर जातवार व वयानुसार 0 ते 18 वयोगट संख्या आपोआप तयार होते

👉🏽कुटुंब संख्या व स्त्री पुरुष लोकसंख्याही आपोआप तयार होते

👉🏽एका क्लिक वर 5+ व 6+ किंवा इतर कोणत्याही वयोगटाची यादी बनवण्याची सोय

👉🏽कागदावर संख्या मोजण्यासाठी लागणाऱ्या वेळेपेक्षा डेटा भरण्यासाठी कितीतरी कमी वेळ लागतो

👉🏽एकदा माहिती भरल्यानंतर वर्षानुवर्षे पटनोंदनी काही मिनिटात करता येईल

👉🏽
http://techgurumarathi.blogspot.com/p/templets.html

🗂वरील लिंक वर इतरही अनेक शाळेयोपयोगी एक्सेल फाईल डाउनलोड साठी उपलब्ध आहेत.

Saturday 18 February 2017

*स्टेट बँक ऑफ इंडिया चे सेव्हिंग खाते (A/c) उघडा ONLINE*
💻    🏦   💳
✍🏻 शब्दांकन:
विक्रांत पाटील (गुंड)
मोबा. नं. 9028551115
👩🏻‍💻
एरव्ही बँकेत खाते उघडण्यासाठी आपल्याला बँकेच्या चकरा माराव्या लागतात, फॉर्म भरावा लागतो, साक्षीदार आणि त्याच्या अकाउंट ची माहिती द्यावी लागते.. परिणामी आपली मोठी दमछाक होते.
😒  😓  😢  😥   😰
*पण आता काळजी करू नका, आता तुम्हीच तुमचे नवीन saving account ओपन करू शकता*
.
😀होय...!!
.
*तेही खालील पद्धतीने..*
👇🏻 👇🏻 👇🏻 👇🏻 👇🏻 👇🏻 👇🏻
1⃣ सर्वप्रथम
https://oaa.onlinesbi.com/oao/onlineaccapp.htm
या वेबसाइटवर जा
2⃣ वेबसाईट ओपन केल्यावर homepage वर Opening Saving Bank Account for Residential असे दिसेल. त्यासमोर *Apply now* असे दिसेल, त्याला क्लिक करा.
3⃣ नेक्स्ट पेज ओपन झाल्यावर customer information service च्या खाली असलेल्या *start new* वर क्लिक करा
4⃣ आता ओपन झालेला फॉर्ममधील सर्व सेक्शन पूर्णपणे आणि अचूक भरा.
या फॉर्म मध्ये ज्याच्या नावाने खाते काढायचे आहे त्याचे
📌 नाव,
📌 जन्मतारीख,
📌 पत्ता,
📌 मोबाईल नं,
📌 आधार नं,
📌 pan नं (असल्यास)
📌 वारसदाराची माहिती
👆👆👆अशा गोष्टी अचूक भरा.
.
आपल्याला या खात्यासोबत हव्या असलेल्या
📌 ATM,
📌 चेकबुक,
📌 इंटरनेट बँकिंग
अशा सुविधा हव्या असल्यास फॉर्ममध्ये सांगितलेल्या ठिकाणी tick mark ✔ करा..
.
📑 फॉर्म चा पहिला टप्पा पूर्ण झाला की नोंदविलेल्या मोबाईल नं वर एक *TCRN* कोड येईल.
📑 हा TCRN वापरून फॉर्म चा दुसरा टप्पा भरा. त्यानंतर मोबाईल वर *TARN* कोड येईल.
5⃣ फॉर्म चे सर्व टप्पे भरून भरून झाल्यावर पुन्हा https://oaa.onlinesbi.com/oao/onlineaccapp.htm# या लिंक ला क्लिक करून home page ओपन करा.
6⃣ होमपेज वर दिसणाऱ्या *Download completed application* वर क्लिक करा. आपल्याला आलेला TARN आणि जन्मतारीख (D.O.B.) वापरून आपण भरलेल्या फॉर्म ची pdf file डाउनलोड करावी व ती प्रिंट करा।
*{Form भरल्यानंतर त्याची pdf तयार होण्यासाठी काही कालावधी लागतो त्यामुळे ही प्रोसेस थोड्या वेळाने करावी.}*
7⃣ प्रिंट काढल्यानंतर फॉर्म वरची माहिती बरोबर असल्याची खात्री करा.
8⃣ फॉर्म मध्ये सांगितलेल्या ठिकाणी आपला पासपोर्ट फोटो चिकटवावा व सह्या/ अंगठे करा.
9⃣ हा भरलेला फॉर्म आणि रहिवाशी व पत्ता पुराव्याची xerox प्रत घेऊन जवळच्या SBI शाखेत जमा करा.
*फॉर्म जमा केल्यावर लगेच आपल्याला आपला saving account नंबर आणि पासबुक मिळेल* त्यावर फोटो चिकटवून बँकेतून स्टॅम्प मारून घ्या..
💳   💳   💳   💳   💳   💳
आपले ATM आपण नोंदविल्या पत्त्यावर 15-20 दिवसात पाठविले जाईल..
🕺
*बघा..*
*जमतंय का..*
*खूप सोप्प आहे....*👍👍👍
🔸🔸
✍🏻 शब्दांकन:
विक्रांत पाटील (गुंड)
मोबा. नं. 9028551115

Monday 30 January 2017

*सरल स्टाफ पोर्टला माहिती कशी भरावी या बाबत इत्यंभूत मार्गदर्शक सुचना*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖

*कर्मचारी मॅपिंग*-
➖➖➖➖➖➖

*1) शाळेतील कर्मचारी मॅप करतांना यु-डायस अथवा शालार्थ दवारे मॅप करावा. जर कर्मचारी केवळ एकाच ठिकाणी दिसुन येत असल्यास MAP WITH ONLY SHALARTH OR UDIES दवारे मॅप करावा*.


*2) जन्म दिनांका मध्ये तफावत असल्यास सदरील कर्मचारी मॅप केल्यानंतर Forward / Return to CH (Cluster Head) / URC या मेनुखालील FOREWORD DATA FOR DOB CORRECTION या टॅब दवारे अचुक जन्म तारीख नोंदवून गटशिक्षणाधिकारी यांचे लॉगीन ला पडताळणी करीता TRANSFER करावा*.


*तसेच सदरील कर्मचाऱ्याचे सेवा पुस्तिकेची पहिल्या पनाची झेरॉक्स व इयत्ता 10 वी प्रमाणपत्राची झेरॉक्स आपले सरल तालुका समन्वयकांकडे समक्ष अथवा व्हॉटस ॲप दवारे पाठविण्यात यावी. जेणेकरुन गटशिक्षणाधिकारी यांचे लॉगीन वरुन जन्म दिनांकाची माहिती तात्काळ दुरुस्त करुन देता येईल*.


*3) मॅपिंग झालेल्या कर्मचारी फिकट निळया रंगामध्ये दिसुन येतो आणि तोच कर्मचारी DATA UPDATED BY HEAD MASTER मेनु मध्ये दिसुन येतो*.


*AFTER MAPPING DATA UPDATED BY HEAD MASTER* -
➖➖➖➖➖➖➖➖➖

*मॅप झालेल्या कर्मचाऱ्यांची जन्म तारीखे व्यतीरीक्त इतर माहिती मधील बदल EDITED BY HEAD MASTER मधुन करता येईल. बदल करण्यात आलेली माहिती SAVE करावी*.


*1) MODE OF GETING POST मध्ये इयत्ता 1 ते 5 शिकवीत असणाऱ्या शिक्षकांसाठी UNDER GRADUATE TEACHER हा पर्याय व इयत्ता 6 ते 8 साठी शिकवीणाऱ्या शिक्षकांकरीता GRADUATE TEACHER हा पर्याय निवडावा*.


*2) जो कर्मचारी मुख्यायाध्यापक या पदावदर प्रत्यक्ष काम करीत असेल त्यांचेच पद HEAD MASTER हे निवडावे. पदभार असलेल्या कर्मचाऱ्यांने आपले मुळ पद नोंदवावे*.

*3) SELECT NATURE OF APPOINTMENT मध्ये जि.प व्यवस्थापनाच कर्मचाऱ्यांचे OPEN SELECTION हा पर्याय निवडावा. व निमशिक्षकांसाठी MERGER हा पर्याय निवडावा. इतर व्यवस्थापनाच्या शाळांनी आपणांस लागु असलेला पर्याय निवडावा*.

*4) AID TYPE मध्ये जि.प.व्यवस्थापनाच शाळांनी AIDED हा पर्याय निवडावा व इतर व्यवस्थापनाच्या शाळांनी आपणांस लागु असलेला पर्याय निवडावा*.



*TEACHING DETAILS* -
➖➖➖➖➖➖➖➖

*PERSONAL DETAILS*
➖➖➖➖➖➖➖➖

*1) PERSONAL DETAILS मध्ये कर्मचाऱ्यास लागु असलेल्या सर्व तारखा मुळ दस्तऐवजावरुन अचूक भराव्यात*.

*2) जिल्हाबदलीने आलेल्या कर्मचाऱ्याची DATE OF JOINING CURRENT MANAGEMENT ही या जिल्ह्रयात रुजू झाल्याचा दिनांक टाकावा*.


*3) PAY / PF / DCPS मध्ये PAY COMMISSION मध्ये PAY COMMISSION हे SIIXTH PAY COMMISSION (STATE) हे निवडुन सध्या लागु असलेली वेतनश्रेणी निवडावी*.


*4) PAY IN BAND हा सदर कर्मचाऱ्याचे मुळ वेतन (BASIC) आहे. ते भरावे. GRADE PAY वर निवडलेल्या PAY SCALE प्रमाणे AUTO UPDATE होवून BASIC PAY मध्ये दोघांची बेरीज AUTO UPDATE होईल*.

*5) PAY w.e.f DATE ही ज्या कर्मचाऱ्यांची वेतनवाढ नियमित आहे त्या सर्वांची दिनांक 01/07/2016 राहील. वेतनवाढ बंद केलेल्या कर्मचाऱ्याची सेवा पुस्तिकेवरुन सध्या वेतन घेत असलेली दिनांक टाकण्यात यावी*.

*6) RECEIVED SENIOR GRADE SCALE मध्ये चटोपाध्याय वेतनश्रेणी मिळाल्याचा दिनांक टाकण्यात यावा. UNTRAINED शिक्षकांच्या बाबतीत सदर दिनांक सेवापुस्तिकेवरुन तापसून घेण्यात यावा*.

*7) RECEIVED SELECTION SENIOR GRADE SCALE मध्ये 24 वर्षानंतर मिळणाऱ्या निवडश्रेणीचा दिनांक टाकण्यात यावा. याठिकाणी लक्षात घ्यावे की, सदर निवडश्रेणी ही प्रत्येक कर्मचाऱ्यांना मिळत नसून जिल्ह्रयातील 20% कर्मचाऱ्यानां देण्यात येते.वेतनश्रेणी मिळाल्याचा दिनांक सेवापुस्तिकेवरुन तापसून घेण्यात यावा*.


*8) PF / DCPS DETAILS -*

*A) GPF लागु असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी A.C TYPE- GPF, A.C MAINTAINED BY - DEPARTMENT , PF SERIES - ZP  व GPF A.C NO टाकावा*.

*B) DCPS DETAILS मध्ये A.C TYPE- DCPS, A.C MAINTAINED BY - DCPS , DCPS SERIES - PRN  व PPAN/PRAN मध्ये सदर कर्मचाऱ्याचा DCPS NO टाकावा. सदर नंबर हा आपल्यास शालार्थ बिलातील INNER PAGE वर मिळेल*.


*9) GIS DETAILS -*

*A) GIS APPLICABLE हे  STATE GIS निवडुन रुपये 60/- , 120/- वर्गणी असणाऱ्यांनी GROUP - C आणि रुपये 480/- वर्गणी असणाऱ्यांनी GROUP - B निवडावा*.

*B) MEMBERSHIP DATE* -

*a) सन 1991 पुर्वीच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी 01/01/1991 हा दिनांक टाकावा*.

*b) सन 1991 नंतरच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी पुढील वर्षाचा 01 जानेवारी हा दिनांक टाकावा*

*c) शिक्षण सेवकासाठी सेवेत कायम ( continuation ) झालेल्या वर्षाच्या पुढील वर्षाचा 01 जानेवारी हा दिनांक टाकावा. (प्रथम नेमणूक दिनांकात 4 वर्ष मिळवावेत.)*


*10) CAST & CERTIFICATION*

*1) या मध्ये कर्मचाऱ्याचा योग्य तो धर्म, प्रवर्ग अणि जात निवडावी*.

*2) CERTIFICATION DETAILS जात प्रमाणपत्राचा क्रमांक, मिळाल्याचा दिनांक व लागु असलेले पर्याय निवडावेत*.

*3) CERTIFICATION VALIDATION DETAILS मध्ये जात वैधता प्रमाणपत्राचा क्रमांक, मिळाल्याचा दिनांक व लागु असलेले पर्याय निवडावेत*.



*11) INITIAL APPOINTMENT DETAILS मध्ये SOCIAL CATEGORY मध्ये आपणांस मिळालेल्या नियुक्तीचा प्रकार टाकावा. (माजी सैनिक,अंपंग, प्रकल्प / भुकंपग्रस्त, खेळाडू इ.) लागु नसल्यास NOT APPLICABLE निवडावे*.

*12) ACADEMIC QUALIFICATION DETAILS -*
➖➖➖➖➖➖➖➖
*A) ACADEMIC QUALIFICATION DETAILS मध्ये कर्मचाऱ्याची उच्चतम पदवी निवडावी. व सदर पदवीशी सुसंगत माहिती भरण्यात यावी*.

*B) PROFESSIONAL QUALIFICATION DETAILS मध्ये कर्मचाऱ्याची उच्चतम पदवी निवडावी. व सदर पदवीशी सुसंगत माहिती भरण्यात यावी*.


*13) SUBJECT TAUGHT DETAILS - मध्ये SUBJECT TAUGHT LEVEL, MEDIUM, CLASS (वर्ग) निवडुन सदर शिक्षक ज्या वर्गांना अध्यापन करीत असलेले सर्व विषय व तासीका (आठवडयाच्या) टाकण्यात याव्यात*.

*उदा- एखादा शिक्षक इयता 4 थी च्या वर्गांस अध्यापन करीत असेल तर इयत्ता 4 थी संपुर्ण वर्गाच्या विषय निहाय तासिका टाकण्यात याव्यात. (ज्याप्रमाणे आपण SCHOOL PORTAL ला TIME TABLE भरला त्याप्रमाणे)*


*14) PHYSICALLY HANDICAP DETAILS मध्ये जर कर्मचारी अपंग असल्यास अपंगत्वाचा प्रकार, अपंगाची टक्केवारी, अपंग प्रमाणपत्राचा क्रमांक इ. अनुषांगीक माहिती भरावी. सध्या प्रमाणपत्र अपलोड करण्याची गरज नाही*.


*15)  DIES QUALIFICATION DETAILS*
➖➖➖➖➖➖➖➖➖

*A) मध्ये गणित, इंग्रजी, सा.शास्त्र कुठल्या इयत्तेपर्यंत शिकलात तो पर्याय निवडुन माहिती SAVE करावी*.

*B) TEACHING LEVEL & MAIN TEACHING SUBJECTS मध्ये कर्मचाऱ्यास लागु असलेली TEACHING LEVEL निवडुन MAIN SUBJECT 1 व 2 मध्ये योग्य ती माहिती नेांदविण्यात यावी*.


*16) U DIES TEACHING DETAILS मध्ये कर्मचारी कोणऱ्या स्तरापर्यंत कोणते विषय शिकवीतो याची महिती भरणे अपेक्षित आहे*.


*17) A) U DIES TARING DETAILS मध्ये मागील वर्षी घेतलेल्या प्रशिक्षणाचा तपशील नोेंदविण्यात यावा*


*B) ACP / SENIOR & SELECTION GRADE TRAINING DETAILS मध्ये चटोपाध्याय वेतनश्रेणी व  निवडश्रेणी प्रशिक्षणाची दिनांक टाकण्यात यावी. प्रशिक्षण प्रमाणत्रावरील दिनांक टाकावी*.

*C) OTHER TRAINING DETAILS मध्ये अपंग विदयार्थ्यांकरीता तसेच संगणकाबाबत विशेष प्रशिक्षण घेतल्यास तशी माहिती नमुद करावी*.

*18) सदर संपुर्ण भरलेली माहिती FORWARD DATA (MENU WISE) या पर्यायातील प्रत्येक TAB निवडुन केंद्रप्रमुखास FORWARD करावी*.


*टीप*

१.
*शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय, दिनांक १९ सप्टेंबर २०१६ अनुसार मूल्यांकनात पात्र घोषित करण्यात आलेल्या १६२८ खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळांना अनुदान देण्यासंदर्भात नमूद केलेल्या अटी व शर्ती मधील मुद्द्दा क्रमांक ७ अनुसार '' शाळेमधील सर्व शिक्षकांच्या आधारकार्डसह वैयक्तिक मान्यतेचे आदेश सरल प्रणालीत भरणे आवश्यक आहे*. ''
२.
*त्या अनुषंगाने वरील शासन निर्णयानुसार अनुदानासाठी पात्र घोषित केलेल्या १६२८ शाळांना त्यांच्या शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती भरण्यासाठी Staff Portal सुरु केलेले आहे. सदरचे login फक्त शासन निर्णयातील नमूद शाळांसाठीच उपलब्ध केलेले आहे. सदरचे काम पूर्ण झाल्यानंतर उर्वरित शाळांसाठी यथावकाश login उपलब्ध केले जातील*.
३.
*सदर १६२८ शाळांनी त्यांच्या शाळातील ज्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती भरलेली नाही अशा शाळांनी सदरची माहिती तात्काळ Staff Portal वर भरावी. कोणत्याही कर्मचाऱ्यांची माहिती अपूर्ण राहणार नाही याची संबंधित शाळा व शिक्षणाधिकारी यांनी नोंद घ्यावी*.
४.
*एखादया शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-याचे नाव Map From Udise मध्ये HM Login वर दिसत नसल्यास त्या कर्मचा-याची माहिती भरण्यासाठी Education Officer (Primary/Secondary) Login वर New Entry चे Form उपलब्ध करुन दिला आहे. तरी शाळांनी संबंधित शिक्षणाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून शिक्षणाधिकारी यांनी पडताळणी करुनच सदरची माहिती भरावी*.
५.
*प्रत्येक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्याचा आधार क्रमांक (UID Number) भरणे Compulsory आहे. तसेच प्रत्येक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्याच्या नियुक्तीचे व वैयक्तिक मान्यतेच्या आदेशाची प्रत upload करणे Compulsory आहे. या व्यतिरिक्त इतर कोणतीही कागदपत्रे upload करावयाची नाहीत याची नोंद घ्यावी*.
६.
*शाळेने Staff Portal वर login करून 1.Personal Details 2.Caste and Certification 3.Initial Appointment Details 4.Qualification Details 5.Physically Handicapped Details ह्या 5-Screen वरील माहिती भरणे आवश्यक आहे. सदरची माहिती भरून ती केंद्रप्रमुख यांना Forward करावी*.
७.
*केंद्रप्रमुख यांनी HM login वरून Forward केलेली माहिती तपासून Verify करावयाची आहे याची नोंद घ्यावी*.