The तंत्रलॉजी
मराठीतून माहिती तंत्रज्ञान.
अँड्रॉइड फोन रूट करणे म्हणजे काय? रूट करण्याचे फायदे आणि तोटे.
तुम्हाला तुमचा अँड्रॉइड फोन तुम्हाला रूट करायचा आहे? पण माहित नाही कसा करावा ते? तर मग आजच्या लेखामध्ये आपण अँड्रॉइड फोन रूट करणे म्हणजे काय? रूट करण्याचे नक्की फायदे आणि तोटे कोणते हे जाणून घेऊया.
१. अँड्रॉइड काय आहे?
-अधिक माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
२. अँड्रॉइड फोन रूट करणे म्हणजे नक्की काय?
अँड्रॉइड रूट करणे हि एक प्रक्रिया आहे जी अँड्रॉइड ओ. एस. वापरकर्त्याला त्याच्या स्मार्टफोन, टॅबलेट पी.सी. वरील संपूर्ण ताबा मिळून देते. रुटींगमुळे मोबाईल फोन कंपनीने फोन तयार करताना फोनवर घातलेल्या बहुतेक सर्व बंधानांवर वापरकर्त्याला ताबा मिळवता येतो तसेच काही उपयोजने (Applications) इन्स्टॉल करता येतात ज्यासाठी व्यवस्थापक (Administrator) दर्जाची आवश्यकता असते.
३. अँड्रॉइड फोन रूट करण्याचे फायदे.
(अ) विशेष उपयोजने वापरता येतात:
तुमचा फोन रूट केल्यानंतर तुम्ही काही विशेष उपयोजने इन्स्टॉल तसेच वापरू शकता ज्यांना रूट प्रवेशाची परवानगी हवी असते साध्या भाषेत सांगायचा झालं तर तुम्ही काही विशेष उपयोजने वापरू शकता जी रूट केलेल्या फोन वरच चालू शकतात. उदाहरणार्थ, १. तुम्ही तुमच्या अँड्रॉइड फोन च्या प्रोसेसरची गती वाढवू शकता ज्याला इंग्रजीमध्ये "Overclocking" असे म्हणतात. २. तुम्ही तुमच्या फोनमधील सुरुवातीपासून इन्स्टॉल असलेली जी तुम्हाला नको असलेली उपयोजने ज्याला इंग्रजी मध्ये "Bloatwares" असे म्हणतात ती तुम्ही डिलीट किंवा अनइन्स्टॉल करू शकता.
माझा सोनी एरिक्सनचा फोन मी रूट
करून मी त्याचा प्रोसेसरची गती वाढवली
आहे म्हणजेच "Overclock" केला आहे.
(ब) तुम्ही कस्टम रोम (ROM ) वापरू शकता:
रुटींग करण्याचा हा सर्वात महत्वाचा फायदा आहे. कधीना कधी तरी आपला फोन जुना होतो आणि बहुतेक सर्व मोबाईल फोन निर्मात्या कंपन्या फोनला अपडेट्स देण बंद करतात, ज्यामुळे आपल्याला आपला फोन जुना वाटू लागतो. ह्यावर उपाय म्हणजे आपला फोन आपण स्वतःच आपल्याला हवा त्या नवीन आवृत्तीमध्ये तसेच आपल्याला हवा तसा फेरफार करून अपडेट करणे. ज्यात वावपार्कार्त्याला त्याचा अँड्रॉइड फोन अँड्रॉइडच्या नवीन सुधारित आवृत्तीच्या तसेच स्वतः फेरफार अथवा बदल केलेल्या रोममध्ये (ज्याला इंग्रजी मध्ये "Custom ROM" असे म्हणतात.) फोन अपडेट करता येतो. आजकाल बहुतेक सर्व अँड्रॉइड फोनसाठी कस्टम रोम इंटरनेटवर सहज सापडतात.
(क) जास्त इंटरनल स्टोरेज:
अँड्रॉइडमध्ये काही उपयोजने फक्त फोन मेमरीमध्ये इन्स्टॉल होतात त्यामुळे आपल्या फोनची इंटरनल स्टोरेज मेमरी लवकर कमी होते. पण रुटींग केलेल्या फोनमध्ये फोन मेमरी मधील उपयोजने मेमरी कार्डमध्ये आपण सहज विस्थापित तथा हलवू शकतो. काही उपयोजने तरीही विस्थापित होत नसतील तर त्यासाठी दुसऱ्या उपयोजनाची आवश्यकता असते जो रूट केलेल्या फोनवरच चालू शकतो. तर हे झाले रूट करण्याचे फायदे. रूट करण्याचे काही तोटे आहेत जे खालीलप्रमाणे.
४. अँड्रॉइड फोन रूट करण्याचे तोटे.
(अ) तुमचा फोन खराब होऊ शकतो:
जर तुम्ही रूट करण्याची प्रक्रिया व्यवस्थित पाळली नाही तसेच कोणतीही स्टेप येत नाही म्हणून गाळली तर तुम्हाला तुमचा फोन गमवावा सुद्धा लागू शकतो. शक्यतो अस काही होत नाही कारण आपणच आपल्या फोनबाबत सतर्क असतो. जर असे काही झाल्यास आपला फोन परत मिळवण्यासाठी आपल्याला इंटरनेट वर खूप मदत मिळू शकते तसेच जर आपला फोन वॉरंटीमध्ये असेल तर काहीच चिंता नाही. पण फोन खराब न होण्याची काळजी घेतलेली बरी.
(ब) तुमच्या फोनची वॉरंटीचा शेवट होऊ शकतो:
जेव्हा तुमचा फोन रूट होईल तेव्हा पासूनचा क्षण तुमच्या फोनच्या वॉरंटीचा शेवट ठरू शकतो त्यामुळे सावधान! जर रूट केल्यानंतर तुमच्या फोनला काही झाले तर तुम्हाला तुमच्या खिशातले पैसे घालून तुमचा फोन रिपेअर करावा लागेल. काही फोन मध्ये अन-रूट (UN-ROOT) म्हणजेच रूट केलेला फोन पूर्वस्थितीत आणण्याची सुविधा असते त्यामुळे तुमचा फोनची वॉरंटी तुम्ही परत आणू शकता.

No comments:
Post a Comment